S M L

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू

09 मेचंदीगढ : पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह हकचा अखेर मृत्यू झाला. 3 मे रोजी जम्मूमधल्या कोट भलवाल तुरुंगात आपापसातल्या भांडणांतून सनाउल्लाहला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारांसाठी चंदिगढला हलवण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. आधी पाकिस्तानात लाहोरच्या तुरुंगात कैद्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये भारतीय कैदी सरबजीत सिंगचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सनाउल्लाहला मारहाण झाली. आज त्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही देशांमधल्या एकमेकांच्या कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झालाय. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सनाउल्लाहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय. तसंच त्याच्या कुटुंबीयांची माफीही मागितली. त्याचा मृतदेह सन्मानानं मायदेशी पाठवण्यासाठी पाकिस्तानला पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं भारतानं स्पष्ट केलंय. सनाउल्लाहवर हल्ला3 मे रोजी सनाउल्लाह हकवर जम्मू मधील कोट लखवाल तुरूंगात भारतीय माजी सैनिकाने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती आणि तो कोमात गेला होता. त्याला तातडीने जम्मू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी त्याला चंदीगढ येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती नाजूक होती. तीन दिवसांपुर्वी ब्रेन डेड झाल्यामुळे त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वेंटिलेटरवर ठेवल्यामुळे फक्त ह्रदय काम करत होतं. त्याला वाचवण्याची शक्यता पुर्णपणे मावळली होती असं त्याच्या भावाने माध्यमांना सांगितलं होतं. पाकिस्तानात भारतीय कैदी सरबजीत सिंग यांच्यावर हल्ला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जम्मूमध्ये हा हल्ला झाला होता. सनाउल्लाहला 17 वर्षांपूर्वी भारतात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हत्या आणि इतर आठ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2013 09:26 AM IST

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू

09 मे

चंदीगढ : पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह हकचा अखेर मृत्यू झाला. 3 मे रोजी जम्मूमधल्या कोट भलवाल तुरुंगात आपापसातल्या भांडणांतून सनाउल्लाहला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारांसाठी चंदिगढला हलवण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

आधी पाकिस्तानात लाहोरच्या तुरुंगात कैद्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये भारतीय कैदी सरबजीत सिंगचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सनाउल्लाहला मारहाण झाली. आज त्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही देशांमधल्या एकमेकांच्या कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झालाय. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सनाउल्लाहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय. तसंच त्याच्या कुटुंबीयांची माफीही मागितली. त्याचा मृतदेह सन्मानानं मायदेशी पाठवण्यासाठी पाकिस्तानला पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं भारतानं स्पष्ट केलंय.

सनाउल्लाहवर हल्ला

3 मे रोजी सनाउल्लाह हकवर जम्मू मधील कोट लखवाल तुरूंगात भारतीय माजी सैनिकाने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती आणि तो कोमात गेला होता. त्याला तातडीने जम्मू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी त्याला चंदीगढ येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

त्यांची प्रकृती नाजूक होती. तीन दिवसांपुर्वी ब्रेन डेड झाल्यामुळे त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वेंटिलेटरवर ठेवल्यामुळे फक्त ह्रदय काम करत होतं. त्याला वाचवण्याची शक्यता पुर्णपणे मावळली होती असं त्याच्या भावाने माध्यमांना सांगितलं होतं. पाकिस्तानात भारतीय कैदी सरबजीत सिंग यांच्यावर हल्ला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जम्मूमध्ये हा हल्ला झाला होता. सनाउल्लाहला 17 वर्षांपूर्वी भारतात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हत्या आणि इतर आठ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close