S M L

कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी हालचालींना सुरुवात

09 मेकर्नाटक: काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वाचे दावेदार असणारे के. सिद्दरामय्या आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट मागितली आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री तिथले आमदार ठरवतील असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय. त्या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. सिद्दरामय्या यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव चर्चेत आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकींच्या निकालावरुन निष्कर्ष काढू नका मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड च्या निवडणुका युपीएसाठी अधिक आव्हानात्मक आहेत. असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:26 PM IST

कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी हालचालींना सुरुवात

09 मे

कर्नाटक: काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वाचे दावेदार असणारे के. सिद्दरामय्या आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट मागितली आहे.

कर्नाटकचा मुख्यमंत्री तिथले आमदार ठरवतील असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय. त्या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली.

सिद्दरामय्या यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव चर्चेत आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकींच्या निकालावरुन निष्कर्ष काढू नका मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड च्या निवडणुका युपीएसाठी अधिक आव्हानात्मक आहेत. असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close