S M L

आता पुढचा नंबर कुणाचा ?

नवी दिल्ली 11 मे : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कायदामंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची हकालपट्टी केली. आता पुढचा नंबर कुणाचा ही चर्चा दिल्लीत सुरू झालीय. पंतप्रधान कार्यालय आणि कोळसा मंत्रालयातील अधिकारी रडारवर असल्याचं समजतंय. ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. कोळसा घोटाळ्याच्या अहवालाबाबत सीबीआयच्या बैठकीत वहानवटी हे कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यासोबत उपस्थित होते. दरम्यान, बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या हकालपट्टीचं श्रेय काँग्रेसनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिलंय. पंतप्रधानांना त्यांच्यावरची कारवाई अनिच्छेनंच करावी लागली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आदेश दिल्यानंतरच पंतप्रधानांनी या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पुढच्या आठड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यावेळी मनमोहन सिंग पक्षात आणखी एकटे पडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 09:34 AM IST

आता पुढचा नंबर कुणाचा ?

नवी दिल्ली 11 मे : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कायदामंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची हकालपट्टी केली. आता पुढचा नंबर कुणाचा ही चर्चा दिल्लीत सुरू झालीय. पंतप्रधान कार्यालय आणि कोळसा मंत्रालयातील अधिकारी रडारवर असल्याचं समजतंय. ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

कोळसा घोटाळ्याच्या अहवालाबाबत सीबीआयच्या बैठकीत वहानवटी हे कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यासोबत उपस्थित होते. दरम्यान, बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या हकालपट्टीचं श्रेय काँग्रेसनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिलंय. पंतप्रधानांना त्यांच्यावरची कारवाई अनिच्छेनंच करावी लागली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आदेश दिल्यानंतरच पंतप्रधानांनी या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पुढच्या आठड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यावेळी मनमोहन सिंग पक्षात आणखी एकटे पडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2013 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close