S M L

पहिलं विश्व साहित्य संमेलन अमेरिकेत

2 जानेवारी, मुंबई अमेरिकेत 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला होणा-या पहिल्या विश्व साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे.अमेरिकेतल्या बे एरिया महाराष्ट्र मंडळ आणि साहित्य महामंडळाच्या वतीनं हे पहिलं विश्व साहित्यसंमेलन होत आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. सॅनहोजे येथील इंडिया कम्युनिटी सेंटर इथं हे संमेलन होणार आहे. सध्या अमेरिकेत आर्थिक मंदी असली तरी त्याचा संमेलनावर कोणताही परिणाम होणार नाही असं बे एरिया मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी सांगितलं. या संमेलनाच्या निमित्तानं युएस साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच एका परदेशस्थ लेखकाला अनिवासी भारतीय पुरस्कारही दिला जाणार आहे. या साहित्य संमेलनाला भारतातून 300 तर अमेरिकेसह जगभरातून 450 साहित्यप्रेमी येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 03:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close