S M L

राणेंच्या विरोधात काँग्रेसी नेते सरसावले

3 जानेवारी मुंबईविनोद तळेकर काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या नेत्यांना लक्ष केलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यामुळे आता राणेंच्या विरोधात काँग्रेस नेतेही प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र दिसतंय. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर काही शांत राहिलेल्या राणेंनी पुन्हा एकदा तोंड उघडलं आणि काँग्रेस नेत्यांनर तोफ डागली. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून राणेंची मनधरणी सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. राणेंनी पुन्हा विलासराव देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतलंय. त्यांनी आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतक-यांच्या कर्जमाफीवरही टीका केली आहे.राणेंच्या आरोपांना काँग्रेसकडून क्वचितच प्रत्युत्तर दिलं जातं हा सर्वसामान्य अनुभव. पण यावेळी मात्र राणेंच्या या हल्ल्याला मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. पत्रकरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतक-यांना दिलेली कर्जमाफीसाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे. तसंच नारायण राणे यांनी आता सोनियांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावं.मुख्यमंत्र्यांनी राणेंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याने आता काँग्रेस नेत्यांनीही राणेंच्या विरोधातलं आपलं मौन सोडून त्यांच्या विरोधात बाह्या सरसावल्यात. त्यामुळे 6 जानेवारीला राणे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 11:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close