S M L

कॅगचे सी लिंक प्रकल्पावर ताशेरे

3 जानेवारी मुंबईप्राची जतानियाकॅगनं राज्य सरकारवर आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एम.एस.आर.डी.सीवर ताशेरे ओढले आहेत. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे बांद्रा-वरळी सी लिंक प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. आणि प्रकल्पाचा खर्च ही वाढतोय अशी टीका या कॅगच्या अहवालात करण्यात आली आहे.बांद्रा-वरळी सी-लिंक मुंबईतला सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प 8 वर्षांपूर्वी सुरू झाला.पण अजूनही पूर्ण झालेला नाही.आता कॅगनं आपल्या अहवालात हा प्रकल्प पूर्ण करण्यात सरकारनं अक्षम्य दिरंगाई केल्याचं म्हटलं आहे.5.6 किलोमीटर लांबीचा हा पूल वरळीला मध्य मुंबईशी जोडणारा प्रकल्प होता. 1999ला याचा अंदाजे खर्च होता 600 कोटी रुपये पण ऑगस्ट 2004 पर्यत यावर 1300 कोटी रुपये खर्च झाला. एम.एस.आर.डी.सीचं या प्रकल्पावरचं नियंत्रण सुटलं.यानंतर मुख्य पुलाचा आराखडा बदलण्याचा निर्णय झाल्यानं पुन्हा 70 कोटी रु.खर्च वाढला. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अनिल देशमुख, ज्यांची हा प्रकल्प राबवण्यात महत्वाची भूमिका होती. पण आता त्यांनी कॅगच्या अहवालावर बोलणं टाळलं. बांद्रा-वरळी सी लिंक हा प्रकल्प सरकारला त्यांच्या शिरपेचातला एक तुरा म्हणून मिरवायचा आहे.पण कॅगच्या या अहवालामुळे विरोधकांना मात्र निवडणुकीसाठी मुद्दा मिळालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 12:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close