S M L

महाराष्ट्र फाऊण्डेशनचे पुरस्कार प्रदान

4 जानेवारी, मुंबई राम जगताप तळागाळातल्या समाजाच्या भल्यासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या व्यथा-वेदनांना आपल्या पुस्तकांतून वाचा फोडणार्‍या लेखकांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. यावर्षीचा समाजकार्यासाठीचा दोन लाख रूपये आणि मानचिन्ह असलेला जीवन गौरव पुरस्कार डॉ. बाबा आढाव यांना तर साहित्यासाठीचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात आला. याशिवाय इतर पात साहित्यिकांना तर सहा कार्यकर्त्यांनाही गौरवण्यात आलं." पुरोगामी साहित्यासाठी पुरस्कार ठेवणं हा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा मी एक भाग समजतो, यातूनच आम्ही हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे, अशी महिती महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांनी दिली. या सामाजिक चळवळीचा आणि महात्मा फुले यांचा खराखुरा वारसदार म्हणजे डॉ. बाबा आढाव.. एक गाव एक पाणवठा ते हमाल पंचायत अशा अनेक आंदोलनात बाबा आढाव यांचा सहभाग राहिला आहे. " जोपर्यंत राजकारण परिवर्तनाशी जोडलेलं आहे तोपर्यंत राजकारण वेगळं कसं काढला येईल ? " असा सवाल बाबा आढाव यांनी यावेळी केला. " मला वाटतं जे काम आम्ही करत आलो ते आणखी चालू ठेवावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि जोमानं ती चालवावी अशी अपेक्षा आहे, " असंही बाबा म्हणाले. " अशा प्रकारचे पुरस्कार हे आपला उत्साह वाढवत असतात आणि जनता आपल्याला सांगत असते की तुमच्यावर आमची काय जबाबदारी आहे. त्यामुळे एकीकडून ही जबाबदारीची वाढती जाणीव आणि दुसरीकडे हा पुरस्कार असा हा दोन्हींचा संगम आहे. " अशी भावना विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र फाऊंडेशन गेली पंधरा वर्षं जबाबदारीची जाणीव आणि पुरस्कार असा दुहेरी संगम घडवून आणला आहे. स्वत:च्या खिशाला खार लावून इतरांसाठी राबणार्‍यांना दाद देणारा हा महाराष्ट्र फाउंडेशनचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यावर्षीच्या समाजकार्य पुरस्काराचे मानकरी डॉ. आनंद तेलतुंबडे - समाजप्रबोधन कुंजबिहारी - पर्यावरण अर्जुन कोकाटे - शैक्षणिक कार्यव्यंकप्पा भोसले - दलितांचे प्रश्न सुरेश खैरनार - सामाजिक सलोखासिम्प्रीत सिंग - युवा पुरस्कार यावर्षीच्या पुरोगामी साहित्याच्या पुरस्काराचे मानकरी प्रज्ञा पवार - मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा - आसाराम लोमटे - इडा पिडा टळोसाठी नीरा आडारकर आणि मीना मेनन - कथा मुंबईच्या गिरणगावची जयदेव डोळे - समाचार मकरंद साठे - आणि ते पुढे गेले (नाटक )

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 05:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 05:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close