S M L

नाशिकच्या थर्ड आयची अंधांसाठी रेकॉर्डिंग योजना

4 जानेवारी, नाशिकदीप्ती राऊत लुईस ब्रेलनं अंधांसाठी ज्ञानाचा खजिना खुला केला नि अंधांसाठी ब्रेल लिपीतून निरनिराळं साहित्य उपलब्ध व्हायला लागलं. आता अंधांनी त्याही पलीकडे उडी मारली आहे. पण आज ब्रेलमधली पुस्तकं फक्त दहावीपर्यंतच उपलब्ध आहेत. म्हणूनच थर्ड आय असोसीएशनसारख्या संस्था ब्रेलचा वारसा पुढे चालवत आहेत. अंधाची क्रमिक पुस्तक रेकॉर्डिंग करण्याचा वसा थर्ड आय असोसीएशननं घेतला आहे. त्यासाठी थर्ड आय असोसिएशनस्‌च्या वीणा सहस्रबुद्धे झटत आहे. अंधाच्या क्रमिक पुस्तकांचं रेकॉर्डिंग करण्याकडे वीणा सहस्रबुद्धे वळल्या त्या रस्ता ओलांडण्यासाठी वाट बघणा-या एका अंध विद्यार्थ्यामुळं. त्यातून थर्ड आयच्या रेकॉर्डिंगच्या कामाचा डोलारा उभा राहिला आहे. ब्रेलची पुस्तकं आहेत ती दहावीपर्यंतच. त्यानंतरच्या कॉलेज शिक्षणासाठी आणि वेगवेगळया व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी यांना रिडर शोधावा लागतो. वीणा ताईंचं रेकॉर्डिस्टचं हे काम आज अनेक अंध विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा करतं आहे. क्रमीक पुस्तकातले शब्द वीणाताईंच्या तोंडून कॅसेटमध्ये पोहोचतात. डबींग मशीन मधून एका कॅसेटच्या अनेक कॅसेट होतात. या कॅसेटसमुळं अंधांना अभ्यास करणं सोपं जात आहे. नजरेची मर्यादा ओलांडून स्पर्शाची भाषा बोलणारी ब्रेललिपी अंधांसाठी वरदान ठरली आहे हे खरं आहे. ब्रेल लिपीतल्या पुस्तकांचं वजन किलो किलोचं व्हायचं. यावर संगणक प्रशिक्षक संदेश नारायणे सांगतात, " ब्रेलची पुस्तकं आपल्या देशात ज्याप्रमाणात निर्माण व्हायला हवीत तेवढी नाहीत. त्यातही मर्यादा आहेत. पॉकेट डीक्शनरीची ब्रेल कॉपी 6 व्हॉल्यूम्समध्ये आहे. अडीचशे पानांचं एक व्हॉल्यूम आणि एकेकाचं वजन 12 ते 15 किलो आहे."कम्युटर हे माध्यमही अंधांसाठी मोठा आधार ठरला आहे. थर्ड आय असोसीएशनच्या माध्यमातून आता रेकॉर्डिंग केलेली पुस्तकं ऑडिओ कार्डवर ट्रान्सफर केली जाताहेत. त्यामुळेही अंधाना त्याचा उपयोग होत आहे. पण वीणाताईंचं स्वप्न मात्र त्याही पलिकडचं आहे. " मला या जास्तीत जास्त मुलांना इंटरनेट शिकवायचंय... माहितीचा महाजाल म्हणतो आपण तो यांच्यासाठी खुला कसं होणार? ही मुलं युपीएससी, एमपीएससी करताहेत. आउटस्टाँडींग परफॉर्मंस देताहेत. संदेशसारखा मुलगा कम्युटर एक्झॅमिनर म्हणून काम करत आहे. असा एक संदेश का? तर शंभर संदेश तयार व्हायला हवेत, " असं वीणाताई म्हणाल्या. थर्ड आयचा उपक्रम पाहता ' थर्ड आय असोसीएशन ' खर्‍या अर्थानं थर्ड आय बनत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 05:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 05:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close