S M L

माटुंग्यातील हिट अ‍ॅन्ड रनची घटना

5 जानेवारी मुंबईअजित मांढरे मुंबईतल्या माटुंगामध्ये हिट अ‍ॅन्ड रनची घटना घडली आहे. माटुंगा इथल्या भाऊ दाजी रोडवर एका व्यक्तीला भरधाव वेगानं जाणा-या गाडीनं उडवल्यामुळे तरुणाला आपले प्राण गमवावे लागले.परंतु अपघात करणारी गाडी मात्र थांबली नाही. ज्या गाडीनं त्या तरुणाचा जीव घेतला ते आरोपी अजूनही फरार आहेत. आयबीएन लोकमतला त्या गाडीचा नंबर मिळाला आहे तो नंबर आहे एमएच 01 पी ए 5495दिनांक 30 डिसेंबर 2008ला संध्याकाळी 10.40 वाजता माटुंग्याचा भाऊदाजी रोडवर अपघात झाला. त्यात अनिल कुमार यादव या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मित्र राजेंद्रही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्यांना ज्या गाडीनं धडक दिली त्या गाडीचा चालक घाबरून तिथून पळून गेला.या अपघाताच्यावेळी तेथे असलेले प्रत्यक्षदर्शी प्रसाद देशपांडे सांगतात, अपघातस्थळी जमलेल्या सर्वांनी पाहिलं की एका काळ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओनं अनिल कुमार आणि त्याच्या मित्राला उडवलं. त्याचवेळी प्रसंगावधान राखून तिथं उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं त्या गाडीचा नंबरही लिहून घेतला. या प्रकरणी माटुंगा पोलीस स्थानक आणि सायन पोलीस स्थानकात दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पण, ते गुन्हे काय आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे पोलीस गाडीच्या त्या ड्रायव्हरचा तपास करत आहे की नाही यावरच शंका व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2009 11:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close