S M L

26/11 चे खटले भारतातच चालवणार

6 जानेवारीमुंबईवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेक्यांवर भारतातच खटले चालवले जातील, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावलं आहे. पाकिस्ताननं मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात दिलंच पाहिजे, असं परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी म्हटलंय. अतिरेक्यांना ताब्यात देण्यासाठी भारतानं आता पाकिस्तानवर दबाव वाढवण्यास सुरूवात केली आहे.मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा दावा भारत सुरूवातीपासूनच करत आलाय. आता पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारतानं पाकिस्तानबरोबरच इतर देशांनाही हल्ल्यासंदर्भातले पुरावे दिले आहेत. मुंबई हल्ल्याचे पुरावे भारतानं सोमवारी औपचारिकपणे पाकिस्तानकडं सुपूर्द केले. भारतानं चीनच्या दूताकडंही पुरावे सादर केलेत. जगभरातल्या राजदूतांना पुरावे देऊन पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे.पुरावे मिळाल्याचं पाकिस्ताननं मान्य केलंय. याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रिचर्ड बाऊचर यांच्याशी त्यांनी चर्चाही केलीय. या पुराव्यांचं परीक्षण केल्यानंतर भारताला औपचारिक उत्तर देऊ असं असिफ अली झरदारी यांनी म्हटलंय. तर या अतिरेक्यांवर भारतातच खटले चालवले जातील असंही भारतानं ठणकावलंय."संसदेवर हल्ला झाल्यानंतर लष्करे तोयबा संघटनेवर बंदी घालण्यात आली. पण ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. अशा अनेक अतिरेकी संघटना दुसर्‍या नावांनी पुन्हा आपल्या सक्रीय झाल्या आहेत. मुंबईवर हल्ला करणार्‍यांना भारतात आणून भारतीय कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा देणे, हेच आमचं लक्ष्य आहे" असं परराष्ट्रसचिव शिवशंकर मेनन यांनी स्पष्ट केलंपाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या भारताच्या भूमिकेचं अमेरिकेनं समर्थन केलंय. FBI ला पाकिस्तानात जाऊन चौकशी करण्याची परवानगी मिळेल, असं अमेरिकेचे भारतातले राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी म्हटलंय. एकंदरीतच दबावतंत्राचा हत्यार उपसणार्‍या पाकिस्तानला भारतानं आता त्याच हत्याराच्या सहाय्यानं वठणीवर आणण्यास सुरूवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2009 05:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 05:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close