S M L

पाकिस्तानने पुरावे नाकारले

6 जानेवारी भारताने पाकिस्तानला मुंबई हल्ल्याचे पुरावे दिले. या पुराव्यांचं परीक्षण करत असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं होतं. दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांनी, भारतानं दिलेल्या पुराव्यातली माहिती खूपच तोकडी आहे. शिवाय ती विश्वासार्ह नाही. असं म्हटलंय. भारत उपखंडाला युद्धाच्या दिशेनं नेत असल्याचा उलटा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडल्याचं ते म्हणाले. या दरम्यान पाकिस्तान भारताविरोधात पुरावे तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे. बलुचिस्तानातील अदिवासी भागात चाललेल्या अतिरेकी कारवायांत भारतीय नागरिकांचा समावेश असल्याबाबतचे हे पुरावे आहेत.मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तान घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेवरही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाचा पुरस्कार करणा-या पाकिस्तानला जगानं एकटं पाडावं, असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. आता भारत मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असलेले पुरावे इतर देशांनाही देणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2009 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close