S M L

धार्मिक एकात्मतेचा कडेगावचा ताबूत

7 जानेवारी, कडेगावआसिफ मुरसलहिंदू मुस्लीम धर्मियांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून सांगली जिल्ह्यातल्या कडेगावकडे बघितलं जातं. येथे मोहरमला निघणार्‍या ताबुतांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इथला मोहरमचा भव्य सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येतात.कडेगावमध्ये मोहरमला गगनचुंबी ताबूत उभारण्याची 200 वर्ष जुनी परंपरा आहे. या गावात मुस्लिमांसोबत हिंदूही या हा सण साजरा करतात. इथं मोहरमचे उंचच उंच ताबूत तयार केले जातात. इथं आधी हिंदुंचे मानाचे ताबूत काढण्याची प्रथा आहे.सध्या कडेगावात 14 ताबूत उभारले जात आहेत. यापैकी निम्मे ताबूत हिंदू उभारतात. ताबूत उभारताना दोरीची कुठेही गाठ दिली जात नाही. एकेक मजले सुटे तयार करून प्रथम कब्ज आणि शेवटी पाया अशाप्रकारे रचना करून हे ताबूत तयार केले जातात. 19 ते 27 मजल्यापर्यंत म्हणजेच 200 ते 250 फूट उंचीच्या ताबुतांची मोहरमच्या दिवशी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. एकेक ताबूत उचलण्यासाठी 200 ते 250 लोक लागतात.एकीकडे देशात धर्माच्या नावावर लोकांचे जीव घेण्याची वृत्ती वाढत असताना कडेगावसारख्या छोट्याशा गावानं हिंदू-मुस्लीम ऐक्याचा आदर्श ठेवला आहे. ऐक्याचा हा संदेश सर्वच धर्मवाद्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 07:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close