S M L
  • एका आधुनिक चारा छावणीची गोष्ट !

    Published On: May 20, 2013 11:26 AM IST | Updated On: May 20, 2013 11:26 AM IST

    मच्छिंद्र टिंगरे, इंदापूरइंदापूर 20 मे : - राज्यातल्या दुष्काळी भागात चारा छावण्यातील भ्रष्टाचाराच्या चुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. या भ्रष्टाचारावर इंदापुरच्या उपविभागीय अधिकारी विजयसींग देशमुख यांनी तोडगा काढला. लाकडी गावच्या चारा छावण्यात रेडिओ फ्रिकवेन्सी व्दारे जनावरांवर लक्ष ठेवलं जातंय. राज्यातला पहिलाच प्रकल्प आहे.पुणे जिल्हयातल्या इंदापूर तालुक्यातल्या लाकडी गावची ही चारा छावणी... छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ही चारा छावणी चालवण्यात येतेय. राज्यातल्या अनेक चारा छावण्या भ्रष्टाचारामुळे गाजत असताना ही चारा छावणी मात्र पारदर्शी चारा छावणी ठरलीय. या चारा छावणीवर रेडिओ ट्रेकिंगनं लक्ष ठेवण्यात येतंय. प्रत्येक जनावाराच्या गळयात मायक्रोचीप बांधण्यात आलीय. याद्वारे छावणीत किती जनावरं आहेत. जनावरांचा मालक कोण, या जनावराला किती चारा दिला जातोय, पशुखाद्य किती दिलं जातंय. या सर्वांची नोंद याठिकाणी ठेवली जातेय.दैनंदिन वापरात तंत्रज्ञाचा वापर करुन भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यात येतो हे अनेकदा सिध्द झालंय. चारा छावण्यांवर सातशे कोटीं रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्यातल्या भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा समोर आल्या. अशा तंत्रज्ञानाचा वापर सगळीकडेच झाला असता तर चारा छावण्यांचा निधी सार्थकी लागला असता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close