S M L

पाकवर वाढता दबाव

8 जानेवारीकसाब हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं मान्य केलं. मात्र सीएनएन आयबीएनपुढे कबुली देणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद दुराणी यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. या विधानानंतर दुराणी यांना तातडीने बडतर्फ करण्यात आलंय. पण हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता आरोप प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली आहे.भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेल्या दबाव मोहिमेला एक आठवड्यानंतर का होईना यश मिळालं आहे. मुंबई दहशतवादी हल्यात पकडला गेलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याचं पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांनी सीएनएन आयबीएन जवळ मान्य केलंय. प्राथमिक चौकशीनंतर हे सत्य पुढं आलय. यासंबंधीचा रिपोर्ट पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. मात्र या खुलाश्यानंतर काही तासातच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अली दुराणी यांना आपलं पद गमवावं लागलं. सरकारला विश्वासात न घेता दुसर्‍या देशाच्या चॅनेलशी थेट बोलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचं मान्य केल्यानंतर पाकिस्तानला आता इतरही काही बाबी मान्य कराव्या लागतील अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं आहे. मुंबई हल्यात ठार झालेले इतर 9 दहशतवादीही पाकिस्तानी नागरिक असल्याचं पाकिस्तानला आता मान्य कराव लागेल. त्यासोबतच पाकिस्ताननं मुंबई हल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींना भारताकडे सोपवावे लागतील. याशिवाय देशातील दहशतवादी नेटवर्कही उध्वस्त करण्यासाठी पाकवर आंतराष्ट्रीय दबाव वाढू शकतो."संयुक्त चौकशीकरण्यासाठी हे सर्व 10 दहशतवादी पाकचे नागरिक असल्याचं पाकिस्तानने मान्य करावं शिवाय या दहशतवादी संघटनेविरुध्द कडक कारवाई करावी तरच संयुक्त चौकशी फायदा आहे." अशी मागणी परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.आता पाकिस्तानला त्यांच्या दूतावासामार्फतकसाबशी संपर्क साधता येऊ शकेल, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलीय. मात्र या कबुलीनंतर पाकिस्तानवर भारतासह आतंराष्ट्रीय दबाव वाढलाय हे निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 05:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 05:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close