S M L
  • हे राम

    Published On: May 20, 2013 02:11 PM IST | Updated On: May 20, 2013 02:11 PM IST

    20 मे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्ताच्या स्लाईडचा लिलाव इंग्लंडमध्ये होणार आहे. येत्या 21 मेला इंग्लंडमधल्या श्रॉफशायरमध्ये हा लिलाव होणार आहे. मुलॉक्स ऑक्शनरीज ही लिलाव करणारी कंपनी गांधीजींच्या 50 वस्तूंचा लिलाव करणार आहे. या लिलावात महात्मा गांधींच्या ब्लड टेस्टसाठी घेण्यात आलेल्या ब्लडस्लाईड्स जवळपास एक ते दीड लाख पौंड इतक्या प्रचंड बोलीने विकल्या जाण्याची शक्यता आहे. 1924 मध्ये गांधीजींवर मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये अपेन्डिक्सचे उपचार सुरु होते तेव्हा त्यांची ब्लडटेस्ट झाली होती. यावेळी गांधीजी मुंबईत जुहू परिसरात ज्या मित्राकडे उतरले होते त्यांच्याकडे या ब्लडस्लाईड्स होत्या. याच परिवाराच्या संग्रहातील वस्तूंचा लंडनमध्ये होणार्‍या लिलावात समावेश आहे. या लिलावात कोणत्या इतर गोष्टींचा लिलाव होतोय ?1. गांधीजींनी लिहिलेलं पत्र : 1937 ला काँग्रेसमधल्या अंतर्गत मतभेदानंतर गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र 40 हजार पौंडला विकलं जाण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली 2. गांधीजींचं दुर्मिळ पेंटिंग3. गांधीजींनी स्वत: विणलेली दैनंदिन वापरातली शाल4. गांधीनी वापरलेली टोपी 5. गांधीजींची चप्पल6. गांधीजींनी मांडलेल्या विचारातल्या तीन माकडांचं शिल्प 7. गांधीजींनी स्वत: विणलेला दोर8. गांधीजींची जपमाळ9. गांधीजींचा थर्मास10. लाकडात कोरलेलं गांधीजींचं चित्र 11. गांधीजींच्या वापरातली भांडी12. गांधीजींच्या वापरातला हातरुमाल 13. गांधीजींच्या संग्रहातलं रामायण14. गांधीजीचं चित्र 15. सरदार पटेल आणि मणिलाल यांना गांधीजींनी पाठवलेला टेलिग्राम याआधी फेब्रुवारीमध्ये मुलॉक्स कंपनीने गांधीजींच्या 1943 मधील पत्राचा लिलाव केला होता. त्यावेळी गांधीजी ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे असेल तर काय केले पाहिजे याचा उहापोह या पत्रात केला आहे. इतिहासाला कलाटणी देणारे हे पत्र होते असा कंपनीचा दावा आहे. मुलॉक्स कंपनीला या पत्राची किंमत दहा हजार पौंड अपेक्षित होती. पण प्रत्यक्षात ते पत्र 1 लाख 15 हजार पौंडाला विकले गेले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने हे पत्र टेलिफोनवरुन खरेदी केले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close