S M L

व्यापार्‍यांना आज संध्याकाळपर्यंतची 'डेडलाईन'

मुंबई 13 मे : एलबीटीबाबत व्यापारी प्रतिनिधी आणि राज्यसरकार यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. सामान्य लोकांना वेठीला धरलं तर व्यापार्‍यांवर कारवाई करू असा इशारा राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलाय. बैठकीचा पहिला टप्पा पार पडला होता. मात्र दुसरा टप्पा निष्फळ ठरला. व्यापार्‍यांना त्यांच्या नेमक्या मागण्यांसाठी संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये एलबीटी लागू होणार आहे. तिथल्या महानगरपालिकांच्या सर्व आयुक्तांना व्यापार्‍यांशी बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महापालिकेच्या आयुक्तांकडून राज्य सरकार अहवाल घेणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने एलबीटीला स्थगिती देण्यास नकार देत व्यापार्‍यांची याचिका फेटाळून लावली होती तरी सुद्धा व्यापार्‍यांचा बंद सुरूच आहे. सरकारची कारवाईची तयारी1. व्यापार्‍यांनी लोकांना वेठीला धरू नये, नाहीतर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत कारवाई करू2. संध्याकाळपर्यंत व्यापार्‍यांनी भूमिका निश्चित करावी. त्यांना विचार करायला वेळ दिलाय3. सर्व अ दर्जाच्या महापालिका आयुक्तांना व्यापार्‍यांसोबत चर्चा करून अहवाल द्यायला सांगितला.4. दोन दिवसांनी पुन्हा होणार बैठक.4.बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करून सर्व महापालिका आयुक्तांचं म्हणणं समजून घेणार

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 12:07 PM IST

व्यापार्‍यांना आज संध्याकाळपर्यंतची 'डेडलाईन'

मुंबई 13 मे : एलबीटीबाबत व्यापारी प्रतिनिधी आणि राज्यसरकार यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. सामान्य लोकांना वेठीला धरलं तर व्यापार्‍यांवर कारवाई करू असा इशारा राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलाय. बैठकीचा पहिला टप्पा पार पडला होता. मात्र दुसरा टप्पा निष्फळ ठरला. व्यापार्‍यांना त्यांच्या नेमक्या मागण्यांसाठी संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

ज्या शहरांमध्ये एलबीटी लागू होणार आहे. तिथल्या महानगरपालिकांच्या सर्व आयुक्तांना व्यापार्‍यांशी बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महापालिकेच्या आयुक्तांकडून राज्य सरकार अहवाल घेणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने एलबीटीला स्थगिती देण्यास नकार देत व्यापार्‍यांची याचिका फेटाळून लावली होती तरी सुद्धा व्यापार्‍यांचा बंद सुरूच आहे.

सरकारची कारवाईची तयारी

1. व्यापार्‍यांनी लोकांना वेठीला धरू नये, नाहीतर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत कारवाई करू2. संध्याकाळपर्यंत व्यापार्‍यांनी भूमिका निश्चित करावी. त्यांना विचार करायला वेळ दिलाय3. सर्व अ दर्जाच्या महापालिका आयुक्तांना व्यापार्‍यांसोबत चर्चा करून अहवाल द्यायला सांगितला.4. दोन दिवसांनी पुन्हा होणार बैठक.4.बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करून सर्व महापालिका आयुक्तांचं म्हणणं समजून घेणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2013 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close