S M L

'सत्यम' चे कर्मचारी युनियन स्थापणार

8 जानेवारीसत्यम कम्प्युटर्सला काल हादरा बसला. कंपनीचे अध्यक्ष रामलिंगम राजू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सत्यममध्ये खळबळ माजली. पण सत्यमच्या कर्मचार्‍यांनी आपल्या नोकर्‍या टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.रामलिंगम राजू यांच्या राजीनाम्यानंतर सत्यमसमोरच्या अडचणी अजून वाढणार आहेत . सत्यम कम्प्यूटर्सच्या कर्मचार्‍यांची झोप तशीही गेल्या काही दिवसांपासून उडालेलीच आहे. कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या सुरक्षित रहाव्यात यासाठी एक युनियन स्थापन करण्याची कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांची योजना आहे. युनियनची घोषणा सतरा जानेवारीनंतर केली जाईल.पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कधीकाळी भविष्यात या युनियनचा फायदा करुन घेता येईल अशा हेतूनं सत्यमचे पदच्युत अध्यक्ष रामलिंगा राजू यांनीच छुपा पाठिंबा दिला होता. राजू यांच्या समर्थकांनी रामलिंगराजू डॉट कॉम नावाची वेबसाईटही सुरू केलीय,ज्यावर आजही त्यांची तारिफ करणारे अनेक संदेश येत आहेत.सत्यममध्ये कर्मचार्‍यांचा हिस्सा वाढवण्यासाठी युनियन प्रयत्न करतेय आणि म्हणूनच एकूण बावन्न हजार कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकाला सत्यमचे शंभर शेअर्स खरेदी करण्यास यूनियननं सांगितलंय. मागील काही दिवसांत सत्यमच्या कर्मचार्‍यांनी एक कोटी शेअर्सची खरेदी केली आहे. अशा प्रकारे एक लाख चौतीस हजार शेअर्स जमल्यावर सत्यमच्या मॅनेजमेंटमध्ये कर्मचार्‍यांचा वाटा दोन टक्के होईल , ज्यानंतर ूयुनियनचा एक प्रतिनिधी सत्यमच्या बोर्डावर घेण्यासाठी मॅनेजमेंट वर दबाव टाकण्यात येईल .

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 05:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 05:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close