S M L

शिवराज सिंह चौहानांनी नातेवाईकांनाच वाटल्या जमिनी !

हेमेंदर शर्मा, भोपाळभोपाळ 14 मे : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सुद्धा नरेंद्र मोदींप्रमाणे भाजपचा विकासाचा चेहरा आहे. पण, चौहान सरकारने आपल्याच नातेवाईकांना अत्यल्प दरानं जमिनी दिल्याचं उघड झालं आहे. इतरांच्या नावे असलेल्या मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी चौहान यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचं माहितीच्या अधिकारातून उघड झालंय. या जमिनी संबंधितांना परत देण्याचे आदेश कोर्टाने देऊनही त्याचं पालन होत नाहीय. इतकंच नाही तर मोक्याच्या ठिकाणची 50 एकर जमीन भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचंही माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय.मध्य प्रदेशाच्या विकासासाठी आपण आपलं आयुष्य खर्ची घालत असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सांगतात. पण, सीएनएन-आयबीएनला मिळालेल्या कागदपत्रांवरून वेगळंच सत्य समोर आलंय. चौहानांच्या या विकासाच्या मॉडेलमुळे मध्यप्रदेश नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचाच विकास झाल्याचं उघड झालंय. योगेश पुरसवानी... त्यांनी भोपाळमध्ये एकवीसशे स्केअर फूटचा प्लॉट घेतला. एका संस्थेकडून 1996 मध्ये त्यांनी हा प्लॉट घेतला. मार्च 2007पर्यंत त्यांनी या प्लॉटसाठी एक लाख 39 हजार रुपये या सोसायटीला दिले. पण, संपूर्ण पैसे दिल्यानंतर त्यांना कळलं की, 10 नोव्हेंबर 2006 ला हा प्लॉट संजय कुमार नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आलाय. त्यानंतर सुरू झाली कोर्टाची लढाई. मार्च 2011 मध्ये कोर्टानं योगेशच्या बाजून निकाल दिला आणि इथूनच सुरू झाली पुढची लढाई...आता 50 लाख रुपये किंमत झालेला हा प्लॉट सध्या संध्या सिंग यांच्या नावावर आहे. पण, त्याचे पती घनश्याम सिंग सर्व कामकाज बघतात. ते भाजपचे नेते आहेत. पण, एकट्या योगेशची ही व्यथा नाही. शेकडो व्यक्तींची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आलीय. या सोसायटीने मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या जवळच्या व्यक्तींना अशाप्रकारे प्लॉट दिलेत. शिवराज सिंग चौहानांचे सावत्र भाऊ रोहीत चौहान यांनाही अशाप्रकारे प्लॉट मिळालेत. रोहीत आणि त्यांची पत्नी रश्मी यांना अत्यंत अल्प दरात अनेक प्लॉट मिळालेत. शिवराज सिंह चौहान यांची वहिनी अनिता चौहान, त्यांचे चुलत भाऊ प्रद्युमन चौहान याशिवाय ब्रिजेश चौहान, धर्मेंद्र चौहान, सीमा चौहान, ममता चौहान, बलवंत चौहान या इतर कुटुंबीयांना आणि सुभाष वर्मा या मित्रालाही प्लॉट मिळाले. फक्त कुटुंबीयच नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनाही शिवराज सिंह चौहान सरकारने अत्यल्प किमतींना जमिनी वाटल्याचं आरटीआयच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना जमिनीशिवराज सिंह चौहान यांची वहिनी अनिता चौहान, त्यांचे चुलत भाऊ प्रद्युमन चौहान याशिवाय ब्रिजेश चौहान, धर्मेंद्र चौहान, सीमा चौहान, ममता चौहान, बलवंत चौहान या इतर कुटुंबीयांना आणि सुभाष वर्मा या मित्रालाही प्लॉट मिळालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 04:50 PM IST

शिवराज सिंह चौहानांनी नातेवाईकांनाच वाटल्या जमिनी !

हेमेंदर शर्मा, भोपाळ

भोपाळ 14 मे : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सुद्धा नरेंद्र मोदींप्रमाणे भाजपचा विकासाचा चेहरा आहे. पण, चौहान सरकारने आपल्याच नातेवाईकांना अत्यल्प दरानं जमिनी दिल्याचं उघड झालं आहे. इतरांच्या नावे असलेल्या मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी चौहान यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचं माहितीच्या अधिकारातून उघड झालंय. या जमिनी संबंधितांना परत देण्याचे आदेश कोर्टाने देऊनही त्याचं पालन होत नाहीय. इतकंच नाही तर मोक्याच्या ठिकाणची 50 एकर जमीन भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचंही माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय.

मध्य प्रदेशाच्या विकासासाठी आपण आपलं आयुष्य खर्ची घालत असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सांगतात. पण, सीएनएन-आयबीएनला मिळालेल्या कागदपत्रांवरून वेगळंच सत्य समोर आलंय. चौहानांच्या या विकासाच्या मॉडेलमुळे मध्यप्रदेश नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचाच विकास झाल्याचं उघड झालंय.

योगेश पुरसवानी... त्यांनी भोपाळमध्ये एकवीसशे स्केअर फूटचा प्लॉट घेतला. एका संस्थेकडून 1996 मध्ये त्यांनी हा प्लॉट घेतला. मार्च 2007पर्यंत त्यांनी या प्लॉटसाठी एक लाख 39 हजार रुपये या सोसायटीला दिले. पण, संपूर्ण पैसे दिल्यानंतर त्यांना कळलं की, 10 नोव्हेंबर 2006 ला हा प्लॉट संजय कुमार नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आलाय. त्यानंतर सुरू झाली कोर्टाची लढाई. मार्च 2011 मध्ये कोर्टानं योगेशच्या बाजून निकाल दिला आणि इथूनच सुरू झाली पुढची लढाई...

आता 50 लाख रुपये किंमत झालेला हा प्लॉट सध्या संध्या सिंग यांच्या नावावर आहे. पण, त्याचे पती घनश्याम सिंग सर्व कामकाज बघतात. ते भाजपचे नेते आहेत. पण, एकट्या योगेशची ही व्यथा नाही. शेकडो व्यक्तींची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आलीय. या सोसायटीने मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या जवळच्या व्यक्तींना अशाप्रकारे प्लॉट दिलेत.

शिवराज सिंग चौहानांचे सावत्र भाऊ रोहीत चौहान यांनाही अशाप्रकारे प्लॉट मिळालेत. रोहीत आणि त्यांची पत्नी रश्मी यांना अत्यंत अल्प दरात अनेक प्लॉट मिळालेत.

शिवराज सिंह चौहान यांची वहिनी अनिता चौहान, त्यांचे चुलत भाऊ प्रद्युमन चौहान याशिवाय ब्रिजेश चौहान, धर्मेंद्र चौहान, सीमा चौहान, ममता चौहान, बलवंत चौहान या इतर कुटुंबीयांना आणि सुभाष वर्मा या मित्रालाही प्लॉट मिळाले. फक्त कुटुंबीयच नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनाही शिवराज सिंह चौहान सरकारने अत्यल्प किमतींना जमिनी वाटल्याचं आरटीआयच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय.

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना जमिनी

शिवराज सिंह चौहान यांची वहिनी अनिता चौहान, त्यांचे चुलत भाऊ प्रद्युमन चौहान याशिवाय ब्रिजेश चौहान, धर्मेंद्र चौहान, सीमा चौहान, ममता चौहान, बलवंत चौहान या इतर कुटुंबीयांना आणि सुभाष वर्मा या मित्रालाही प्लॉट मिळालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2013 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close