S M L

रिव्ह्यु :'औरंगजेब'

अमोल परचुरे,समीक्षक17 मे : 'औरंगजेब'...वैशिष्टयपूर्ण शीर्षकं हे आता हळूहळू बॉलीवूडचे वैशिष्टय बनत चाललंय. प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणली जाणार हे ओळखून औरंगजेब हे नाव देण्यात आलंय हे तर स्पष्टच आहे. अर्थातच हा काही औरंगजेबवर बनलेला सिनेमा नाही. पण औरंगजेबच्या कपटी प्रवृत्तीवर बेतलेला हा सिनेमा आहे. 'सपनों की किमत अपनों से ज्यादा होती है' म्हणजेच आपल्या स्वप्नांच्या आड जवळची माणसं जरी येत असतील तरी त्यांची पर्वा करु नका, हाच तो औरंगजेबी मंत्र...पण यापेक्षाही सिनेमाचा विषय, त्याचा आवाका, त्यातील व्यक्तिरेखा यासुध्दा वैशिष्टयपूर्ण आहेत. फक्त एकच गोष्ट म्हणजे 'पेशन्स' असेल तरच हा सिनेमा शेवटपर्यंत बघू शकाल. सिनेमा संथ नाहीये पण शांतपणे पुढे जाणारा आहे. त्यामुळे काही ठिकाणी या शांतपणासोबत जुळवून घेत सिनेमाचा आनंद घेता येईल, अन्यथा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो.सध्या पूर्ण देशभरात हे बघायला मिळतंय की, शहरांच्या सीमा वाढतायत, आसपासच्या गावांपर्यंत ही शहरं पोचलेली आहेत. मुंबई असेल पुणे असेल किंवा दिल्लीसारखी देशाची राजधानी...काही वर्षांपूर्वीपर्यंत दिल्ली शहराला खेटून होतं एक गाव जे आता एक अत्याधुनिक कॉर्पोरेट शहर बनलेलं आहे. गुडगाव... गाव ते शहर हा कायापालट होताना अर्थातच तिथे जमिनींचे भाव प्रचंड वाढले. मग यातून राजकारणी, कॉर्पोरेट कंपन्या आणि माफिया यांनी हातमिळवणी केली, आणि मग रिअल इस्टेटच्या आडून सुरु झाला करोडोंचा गैरव्यवहार...याच बॅकड्रॉपवर आहे औरंगजेब हा सिनेमा.. बदललेल्या गुडगावमध्ये एक आहे माफिया फॅमिली आणि एक आहे पोलिस फॅमिली..दोन्ही कुटुंबप्रमुखांचा हेतू स्पष्ट आहे कोणत्याही मार्गाने पैसे कमावणे. एकमेकांवर कुरघोडी करता करमा पोलिस फॅमिलीला माफियांच्या घरात एक औरंगजेब पेरायची संधी मिळते आणि मग त्याचे काय काय परिणाम होतात ते सिनेमाभर बघायला मिळतात.'औरंगजेब'ची कथा वरवर डॉनसारखी वाटत असली तरी डॉनसारखी साचेबद्ध नक्कीच नाही. हा केवळ दोन कुटुंबांमधला संघर्ष नाही, त्याअर्थाने हिरो-व्हिलन असा ब्लॅक-व्हाईट लढा नाही. काळ बदलतो तसा माणूसही बदलू शकतो. कोणीच आयुष्यभर चांगला किंवा वाईट असत नाही अशा अनेक गोष्टीसुद्धा यातून मांडण्याचा प्रयत्न झालाय. देशभरात घडणार्‍या अनेक घटनांचं चित्रण आपण न्यूज चॅनेल्सवरुन बघत असतो, पण जसं दिसतं, तसं प्रत्येकवेळी नसतं असं या बाबतीत होऊ शकतं. औरंगजेब सिनेमात शहराची वाढ होताना ज्याप्रकारचा व्यवहार होतो, आणि त्यात सामान्य कसे भरडले जातात याचं चित्रणही उत्तमरित्या केलेलं आहे. एखाद्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मिळाव्यात यासाठी कंपन्यांचे प्रयत्न आणि त्याविरोधात राजकीय विरोधी पक्षाचं शेतकर्‍यांसोबत आंदोलन अशा घटना वरवर दिसत असल्या तरी त्याचं मूळ दोन फॅमिलीतल्या संघर्षात असतं. मुख्य कथेच्या भोवती अशी अनेक गोष्टींची गुंफण असली तरी प्रेक्षकाचा गोंधळ उडणार नाही असा प्रयत्न लेखक दिग्दर्शक अतुल सभरवाल यांनी केलेला आहे, अर्थात काही ठिकाणी ही कथा ट्रॅक सोडते आणि त्यामुळे कनेक्ट काही वेळा तुटतो, हे खरं असलं तरी सर्व कलाकारांच्या तडाखेबाज अभिनयानं प्रेक्षक गुंतून राहतो.दिग्दर्शन, लेखन, संकलन, कॅमेरावर्क या सगळ्यांपेक्षा सरस आहे तो म्हणजे सर्व कलाकारांचा अभिनय...हिरो म्हणून एक काळ गाजवल्यानंतर आता आपण सेकंड इनिंग गाजवायलासुध्दा तितकेच समर्थ आहोत हे ऋषी कपूरने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. अय्या सिनेमातून हिंदीत आलेला पृथ्वी हा दाक्षिणात्य अभिनेता गंभीर भूमिकेतसुध्दा तगडी छाप पाडतो..जॅकी श्रॉफ, अमृता सिंग यांनी आपापले रोल्स ब-यापैकी निभावलेत. साशा आगा ही हिरॉईन म्हणजे बालकलाकारच वाटते आणि अभिनयातही ती बरीच कच्ची आहे. अर्जुन कपूरसाठी हा खरंतर ड्रीमरोल म्हणायला हवा. करिअरच्या दुसर्‍याच सिनेमात त्याला डबलरोल मिळालाय. दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा साकारण्याचं आव्हान त्याने बर्‍यापैकी पेललंय, पण दाढीमिशा नसताना त्याच्या मर्यादा उघड पडतात हे खरं असलं तरी एकंदरित त्याने चांगलीच छाप पाडलेली आहे. यशराजचा सिनेमा असूनही गाणी यथातथाच आहेत. क्लायमॅक्सही लांबलेला आहे. अशा काही त्रुटी असल्या, तरी परिपूर्ण सिनेमाच्या जवळ जाणारा सिनेमा बघितल्याचं समाधनन नक्कीच मिळू शकतं.'औरंगजेब'ला रेटिंग - 60/100 औरंगजेबची टीमनिर्माता दिग्दर्शक - अतुल सभरवालकलाकार - अर्जुन कपूर, पृथ्वी सुकुमारन, साशा आगासंगीत - अमृत्य राहुत, विपिन मिश्रा

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 05:24 PM IST

रिव्ह्यु :'औरंगजेब'

अमोल परचुरे,समीक्षक

17 मे : 'औरंगजेब'...वैशिष्टयपूर्ण शीर्षकं हे आता हळूहळू बॉलीवूडचे वैशिष्टय बनत चाललंय. प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणली जाणार हे ओळखून औरंगजेब हे नाव देण्यात आलंय हे तर स्पष्टच आहे. अर्थातच हा काही औरंगजेबवर बनलेला सिनेमा नाही. पण औरंगजेबच्या कपटी प्रवृत्तीवर बेतलेला हा सिनेमा आहे.

'सपनों की किमत अपनों से ज्यादा होती है' म्हणजेच आपल्या स्वप्नांच्या आड जवळची माणसं जरी येत असतील तरी त्यांची पर्वा करु नका, हाच तो औरंगजेबी मंत्र...पण यापेक्षाही सिनेमाचा विषय, त्याचा आवाका, त्यातील व्यक्तिरेखा यासुध्दा वैशिष्टयपूर्ण आहेत. फक्त एकच गोष्ट म्हणजे 'पेशन्स' असेल तरच हा सिनेमा शेवटपर्यंत बघू शकाल. सिनेमा संथ नाहीये पण शांतपणे पुढे जाणारा आहे. त्यामुळे काही ठिकाणी या शांतपणासोबत जुळवून घेत सिनेमाचा आनंद घेता येईल, अन्यथा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो.

सध्या पूर्ण देशभरात हे बघायला मिळतंय की, शहरांच्या सीमा वाढतायत, आसपासच्या गावांपर्यंत ही शहरं पोचलेली आहेत. मुंबई असेल पुणे असेल किंवा दिल्लीसारखी देशाची राजधानी...काही वर्षांपूर्वीपर्यंत दिल्ली शहराला खेटून होतं एक गाव जे आता एक अत्याधुनिक कॉर्पोरेट शहर बनलेलं आहे. गुडगाव... गाव ते शहर हा कायापालट होताना अर्थातच तिथे जमिनींचे भाव प्रचंड वाढले.

मग यातून राजकारणी, कॉर्पोरेट कंपन्या आणि माफिया यांनी हातमिळवणी केली, आणि मग रिअल इस्टेटच्या आडून सुरु झाला करोडोंचा गैरव्यवहार...याच बॅकड्रॉपवर आहे औरंगजेब हा सिनेमा.. बदललेल्या गुडगावमध्ये एक आहे माफिया फॅमिली आणि एक आहे पोलिस फॅमिली..दोन्ही कुटुंबप्रमुखांचा हेतू स्पष्ट आहे कोणत्याही मार्गाने पैसे कमावणे. एकमेकांवर कुरघोडी करता करमा पोलिस फॅमिलीला माफियांच्या घरात एक औरंगजेब पेरायची संधी मिळते आणि मग त्याचे काय काय परिणाम होतात ते सिनेमाभर बघायला मिळतात.'औरंगजेब'ची कथा वरवर डॉनसारखी वाटत असली तरी डॉनसारखी साचेबद्ध नक्कीच नाही. हा केवळ दोन कुटुंबांमधला संघर्ष नाही, त्याअर्थाने हिरो-व्हिलन असा ब्लॅक-व्हाईट लढा नाही. काळ बदलतो तसा माणूसही बदलू शकतो. कोणीच आयुष्यभर चांगला किंवा वाईट असत नाही अशा अनेक गोष्टीसुद्धा यातून मांडण्याचा प्रयत्न झालाय.

देशभरात घडणार्‍या अनेक घटनांचं चित्रण आपण न्यूज चॅनेल्सवरुन बघत असतो, पण जसं दिसतं, तसं प्रत्येकवेळी नसतं असं या बाबतीत होऊ शकतं. औरंगजेब सिनेमात शहराची वाढ होताना ज्याप्रकारचा व्यवहार होतो, आणि त्यात सामान्य कसे भरडले जातात याचं चित्रणही उत्तमरित्या केलेलं आहे. एखाद्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मिळाव्यात यासाठी कंपन्यांचे प्रयत्न आणि त्याविरोधात राजकीय विरोधी पक्षाचं शेतकर्‍यांसोबत आंदोलन अशा घटना वरवर दिसत असल्या तरी त्याचं मूळ दोन फॅमिलीतल्या संघर्षात असतं.

मुख्य कथेच्या भोवती अशी अनेक गोष्टींची गुंफण असली तरी प्रेक्षकाचा गोंधळ उडणार नाही असा प्रयत्न लेखक दिग्दर्शक अतुल सभरवाल यांनी केलेला आहे, अर्थात काही ठिकाणी ही कथा ट्रॅक सोडते आणि त्यामुळे कनेक्ट काही वेळा तुटतो, हे खरं असलं तरी सर्व कलाकारांच्या तडाखेबाज अभिनयानं प्रेक्षक गुंतून राहतो.दिग्दर्शन, लेखन, संकलन, कॅमेरावर्क या सगळ्यांपेक्षा सरस आहे तो म्हणजे सर्व कलाकारांचा अभिनय...हिरो म्हणून एक काळ गाजवल्यानंतर आता आपण सेकंड इनिंग गाजवायलासुध्दा तितकेच समर्थ आहोत हे ऋषी कपूरने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. अय्या सिनेमातून हिंदीत आलेला पृथ्वी हा दाक्षिणात्य अभिनेता गंभीर भूमिकेतसुध्दा तगडी छाप पाडतो..जॅकी श्रॉफ, अमृता सिंग यांनी आपापले रोल्स ब-यापैकी निभावलेत.

साशा आगा ही हिरॉईन म्हणजे बालकलाकारच वाटते आणि अभिनयातही ती बरीच कच्ची आहे. अर्जुन कपूरसाठी हा खरंतर ड्रीमरोल म्हणायला हवा. करिअरच्या दुसर्‍याच सिनेमात त्याला डबलरोल मिळालाय. दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा साकारण्याचं आव्हान त्याने बर्‍यापैकी पेललंय, पण दाढीमिशा नसताना त्याच्या मर्यादा उघड पडतात हे खरं असलं तरी एकंदरित त्याने चांगलीच छाप पाडलेली आहे. यशराजचा सिनेमा असूनही गाणी यथातथाच आहेत. क्लायमॅक्सही लांबलेला आहे. अशा काही त्रुटी असल्या, तरी परिपूर्ण सिनेमाच्या जवळ जाणारा सिनेमा बघितल्याचं समाधनन नक्कीच मिळू शकतं.

'औरंगजेब'ला रेटिंग - 60/100

औरंगजेबची टीमनिर्माता दिग्दर्शक - अतुल सभरवालकलाकार - अर्जुन कपूर, पृथ्वी सुकुमारन, साशा आगासंगीत - अमृत्य राहुत, विपिन मिश्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2013 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close