S M L

कुर्ला पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

8 जानेवारी, मुंबईअमेय तिरोडकरमध्य मुंबईतील कुर्ला भागात मुंबई महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे. वॉर्ड क्रमांक 160 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक शांताराम नाईक यांच्या निधनामुळे ही निवडणूक होणार आहे. पण, या निवडणुकीला खास महत्व आलंय. ह्या निवडणूकीत जर शिवसेनेचा उमेदवार हरला तर मुंबई महापालिकेतील शिवसेना - भाजप युतीच्या सत्तेला हादरा बसण्याची शक्यता आहे.कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आरपीआय एकत्र आलीय. उद्देश एकच. कुर्ल्यात शिवसेनेच्या उमेदवाराला हरवणं. मुंबई महापालिकेत 227 नगरसेवक आहेत. पैकी पाच जागा वेगवेगळ्या कारणाने रिकाम्या आहेत. तर, उरलेल्या 222 मध्ये 113 नगरसेवक सत्ताधारी शिवसेना - भाजप युतीकडे आहेत. यात शिवसेनेचे 82 आणि भाजपचे 29 नगरसेवक आहेत. विरोधकांकडे एकशे आठ नगरसेवक आहेत. त्यात कॉंग्रंेसचे 81, राष्ट्रवादी 14, समाजवादी पक्ष 7 आणि मनसेचे 6 नगरसेवक आहेत. दोन नगरसेवक अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचे आहेत. जर ही कुर्ल्यातील पोटनिवडणूक राष्ट्रवादीनं जिंकली तर काँग्रेस आणि मित्र पक्षांचे 109 नगरसेवक होतील. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय की अखिल भारतीय सेनेचे दोघेही जण आपल्याकडे येतील. यातून त्यांचं आणि सेना भाजपचं बलाबल 111 म्हणजे समान होईल. यासाठीच काँग्रेसनं मतांचं गणित जमवलंय. गेल्यावेळी मतांचं विभाजन झाल्यामुळे 92 मतांनी इथे राष्ट्रवादी हरली. यावेळी मात्र बिगर हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले आहेत. जर 160 मधील ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी जिंकली तर, मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची कांटे की टक्कर होईल. लोकसभेच्या निवडणुका बघता शिवसेनेला मुंबईतच नामोहरम करण्याची संधी कॉंग्रेस आघाडीला मिळेल. हे ओळखूनच शिवसेना कामाला लागलीय. निधन झालेल्या शांताराम नाईक यांचा मुलगा बाळा नाईकना त्यांनी उमेदवारी दिलीय. सहानभुतीच्या लाटेवर शिवसेनेचा भरोसा आहे. वडिलांनी केलेल्या कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकता येईल असं खुद्द बाळा नाईक यांनाही वाटतंय.शिवसेनेच्या चार नगरसेवकांचं भवितव्य जातपडताळणी समितीवर अवलंबून आहे. बोगस जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा त्यांच्या वर आरोप आहे. यापूर्वी शिवसेनेच्या चार नगरसेवकांचं पद जातपडताळणी समितीनं रद्द ठरवलंय. त्यामुळं कुर्ला निवडणूक जिंकली तर महापालिकेत सत्ता मिळवण्याची आशा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 10:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close