S M L

भारत आणि चीनदरम्यान आठ नवे करार

नवी दिल्ली 20 मे : भारत आणि चीननं आज आठ नव्या करारांवर सह्या केल्या. तसंच दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिला परदेशी दौरा करण्यासाठी भारताची निवड केल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या 25 वर्षांमध्ये चीनमधील भारत आणि चीन या देशांदरम्यानचे संबंध सुधारल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही असा निर्वाळा चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी आज दिला. ली यांनी थोड्या वेळापूर्वी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भारत आणि चीनची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांश आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा विकास झाल्याशिवाय जग विकसित होणार नाही असं ते म्हणाले. भारत दौर्‍यादरम्यान आपण द्विपक्षीय संबंधावर भर देणार असल्याचंही ली यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, ली केकियांग यांच्याविरोधात दिल्लीतल्या तिबेटी नागरिकांनी निदर्शनं केली. चीननं तिबेटवरचा ताबा सोडावा अशी तिबेटी नागरिकांची जुनीच मागणी आहे. रविवारी भाजपनंही लडाखमधल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून चीनविरोधात जंतरमंतर या ठिकाणी निदर्शनं केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2013 11:16 AM IST

भारत आणि चीनदरम्यान आठ नवे करार

नवी दिल्ली 20 मे : भारत आणि चीननं आज आठ नव्या करारांवर सह्या केल्या. तसंच दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिला परदेशी दौरा करण्यासाठी भारताची निवड केल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे आभार मानले.

गेल्या 25 वर्षांमध्ये चीनमधील भारत आणि चीन या देशांदरम्यानचे संबंध सुधारल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही असा निर्वाळा चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी आज दिला. ली यांनी थोड्या वेळापूर्वी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भारत आणि चीनची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांश आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा विकास झाल्याशिवाय जग विकसित होणार नाही असं ते म्हणाले. भारत दौर्‍यादरम्यान आपण द्विपक्षीय संबंधावर भर देणार असल्याचंही ली यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ली केकियांग यांच्याविरोधात दिल्लीतल्या तिबेटी नागरिकांनी निदर्शनं केली. चीननं तिबेटवरचा ताबा सोडावा अशी तिबेटी नागरिकांची जुनीच मागणी आहे. रविवारी भाजपनंही लडाखमधल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून चीनविरोधात जंतरमंतर या ठिकाणी निदर्शनं केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2013 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close