S M L

औरंगाबादमध्ये भूखंडांची खिरापत

8 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडदेशभरात महागाईचा आगडोंब उसळलेला असल्यानं दुकान विकत घेणं तर सोडाच पण दुकान भाडे तत्वावर घेताना भल्याभल्यांचे डोळे पांढरे होतात. औरंगाबाद महापालिकेच्या उदार धोरणामुळं मात्र अगदी नाममात्र दरात मोक्याच्या ठिकाणच्या जागा तुम्हांला घेता येऊ शकतील. तुमच्याकडं फक्त हवी साम-दाम नीती. औरंगाबाद महापालिकेत भूखंड घोटाळे गाजत असतानाच आता भाडेतत्वावर दिलेल्या जागांचा महाघोटाळा उघड झालायं. शहराच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या जागांची महापालिकेनं किरकोळ रकमा घेऊन खिरापतच वाटलीय."मोक्याच्या ठिकाणची एक जागा सिल्लेखाना भागातील आम्ही ताब्यात घेतलीय. इतरही मोक्याच्या जागा ताब्यात घेऊ . त्यात महापालिकेचा फायदा होईल. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला नाही" असं सिटी इजिनिअर भागवत म्हस्के यांनी सांगितलं.असे आहेत महापालिकेचे दर : सारस्वत, बॉम्बे मर्कंटाईल आणि पीपल्स बँकांना एक हजार चौरस फूटांपेक्षा जास्त जागेसाठी जेमतेम एक हजार रूपये. सहाशे 84 चौरस फुट जागेसाठी औषधी भवनकरीता वर्षाला फक्त नऊशे रूपये भाडं. शहागंजामधल्या पेट्रोल पंपाला दोनशे चौरस फूटासाठी वर्षाला केवळ दोनशे चाळीस रूपये. तर क्रांतीचौकातील चार सॉ मिल्ससाठी हजार चौरस फुटाला केवळ हजार रूपये दराने जागा देण्यात आली आहे. याशिवाय क्रांतीचौकात स्वत:ची वाहन लावण्यासाठी सवलतीच्या दरानं भूखंड बहाल करण्यात आला. ही सर्व खिरापत वाटताना सत्तेवर असलेल्या शिवसेनेनं त्याचा फायदा उचलला नसता तरच नवल. म्हणूनच औरंगपुर्‍यातील नाल्यावरील मोक्याची जागा त्यांना नाममात्र दरानं बहाल करण्यात आली. एवढी प्रकरणं उघडकीस आल्यानंतर तरी महापालिकेनं जागं होऊन कारवाई करण्याची गरज आहे. तरच महापालिकेची विश्वासार्हता टिकून राहील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 11:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close