S M L

जावयाला अटक झाली तर श्रीनिवासन होतील पायउतार

मुंबई 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आज कोणत्याही परिस्थिती मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. मय्यपन मदुराईवरुन 5 वाजता विमानाने मुंबईत येतील त्यावेळी त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जावयाला अटक होत असल्यामुळे श्रीनिवासन यांना चांगलाचे संतापले आहे. माझ्या जावयाला अटक झाली तर अध्यक्षपदाचा राजीनामा देईल अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावाच अशी मागणी केली आहे. गुरूवारी गुरुनाथ मय्यप्पन यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक चेन्नईत त्यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र मय्यप्पन हे चेन्नईत नव्हते. यामुळे पोलिसांनी मय्यप्पन यांना समन्स बजावली होती. आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. मुंबई पोलिसांनी मय्यप्पन यांना चौकशीसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. अखेर मय्यप्पन हे मुंबईत पाचच्या सुमारास मुंबई चौकशीसाठी दाखल होणार आहे. त्यांच्याबरोबर श्रीनिवासन यांचे सेक्रेटरी राजन, त्यांचे वकील रमन आणि मित्र जॉर्ज जॉन असतील. मय्यप्पन मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलीस त्याला अटक करतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता विंदू दारा सिंगनं दिलेल्या माहितीनुसार मय्यपन यांनी प्रत्येक मॅचमध्ये 10 लाख ते 1 करोड दरम्यान बेटिंग केलं होतं. मय्यपन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या 3 मॅच आणि एतर काही मॅचमध्ये बेटिंग केल्याची माहिती मिळतेय. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का?आरोप 1 - 2007 : बीसीसीआयच्या सचिवपदावर असताना आयपीएलची मालकी मिळविण्यासाठी घटनेत केला बदलआरोप 2 - 2009 : आयपीएलमध्ये फ्लिंटॉफसाठी मोर्चेबांधणीआरोप 3 - 2009 : आयपीएलमध्ये अंपायरच्या नियुक्त्या बदलल्याआरोप 4 - ए. सी. मुथ्थया यांनी श्रीनिवासन यांच्या हितसंबधांवर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. आरोप 5 - आयपीएल टीमची मालकी असतानाही गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवलंआरोप 6 - बीसीसीआय आणि भारतीय चेस फेडरेशनचे एकाचवेळी अध्यक्ष. विरोधानंतर चेस फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामाआरोप 7 - बीसीसीआयचं सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषवण्यासाठी घटनेत बदल केला

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2013 11:19 AM IST

जावयाला अटक झाली तर श्रीनिवासन होतील पायउतार

मुंबई 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आज कोणत्याही परिस्थिती मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. मय्यपन मदुराईवरुन 5 वाजता विमानाने मुंबईत येतील त्यावेळी त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जावयाला अटक होत असल्यामुळे श्रीनिवासन यांना चांगलाचे संतापले आहे. माझ्या जावयाला अटक झाली तर अध्यक्षपदाचा राजीनामा देईल अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावाच अशी मागणी केली आहे.

गुरूवारी गुरुनाथ मय्यप्पन यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक चेन्नईत त्यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र मय्यप्पन हे चेन्नईत नव्हते. यामुळे पोलिसांनी मय्यप्पन यांना समन्स बजावली होती. आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. मुंबई पोलिसांनी मय्यप्पन यांना चौकशीसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

अखेर मय्यप्पन हे मुंबईत पाचच्या सुमारास मुंबई चौकशीसाठी दाखल होणार आहे. त्यांच्याबरोबर श्रीनिवासन यांचे सेक्रेटरी राजन, त्यांचे वकील रमन आणि मित्र जॉर्ज जॉन असतील. मय्यप्पन मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलीस त्याला अटक करतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता विंदू दारा सिंगनं दिलेल्या माहितीनुसार मय्यपन यांनी प्रत्येक मॅचमध्ये 10 लाख ते 1 करोड दरम्यान बेटिंग केलं होतं. मय्यपन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या 3 मॅच आणि एतर काही मॅचमध्ये बेटिंग केल्याची माहिती मिळतेय.

श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का?

आरोप 1 - 2007 : बीसीसीआयच्या सचिवपदावर असताना आयपीएलची मालकी मिळविण्यासाठी घटनेत केला बदलआरोप 2 - 2009 : आयपीएलमध्ये फ्लिंटॉफसाठी मोर्चेबांधणीआरोप 3 - 2009 : आयपीएलमध्ये अंपायरच्या नियुक्त्या बदलल्याआरोप 4 - ए. सी. मुथ्थया यांनी श्रीनिवासन यांच्या हितसंबधांवर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. आरोप 5 - आयपीएल टीमची मालकी असतानाही गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवलंआरोप 6 - बीसीसीआय आणि भारतीय चेस फेडरेशनचे एकाचवेळी अध्यक्ष. विरोधानंतर चेस फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामाआरोप 7 - बीसीसीआयचं सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषवण्यासाठी घटनेत बदल केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2013 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close