S M L

नक्षली हल्लात काँग्रेस नेत्यांसह 16 ठार

छत्तीसगढ 25 मे : छत्तीसगडमधल्या बस्तर भागात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी आज संध्याकाळी साडेचार वाजता केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार आणि छत्तीसगडचे माजी गृहमंत्री महेंद्र कर्मा यांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे माजी आमदार उदय मुदलीयार यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल गोळीबारात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर आत्ता जगदलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. एअर ऍम्ब्युलन्स मिळाल्यावर त्यांना रायपूरला हलवलं जाईल. तर तिकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांचं माओवाद्यांनी अपहरणही केलंय. काँग्रेसचे काही कार्यकर्तेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असण्याची भिती व्यक्त करण्यात येतेय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जण दगावलयाची भीती व्यक्त केलीय. सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाचं शिष्टमंडळ छत्तीसगढसाठी रवाना झालंय.छत्तीसगडमध्ये या वर्षाअखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 12 एप्रिल रोजी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू करण्यात आली होती. आज परिवर्तन यात्रा पूर्ण करुन सुमारे 20 गाड्यांतून काँग्रेसच्या 150 नेते आणि कार्यकर्त्यांचा ताफा परत निघाला होता. छत्तीसगडमधल्या घनदाट जंगलामध्ये जिरमघाटी इथं हा ताफा पोहचला त्यावेळी नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित कटानुसार इथं भूसुरुंग वापरुन हल्ला केला. या स्फोटामुळे एकच गोंधळ उडाला. लपून बसलेल्या माओवाद्यांनी ताफ्याला घेरा घातला आणि बेछुट गोळीबार सुरू केला. संध्याकाळी सव्वाचार ते साडे सहा वाजेपर्यंत हा हल्ला सुरू होता. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा प्रतिकार तोकडा पडला. त्यांच्या जवळच्या गोळ्या संपल्यामुळे माओवाद्यांनी थेट ताफ्यावर हल्लाबोल केला. मदतकार्य पोहचू नये म्हणून माओवाद्यांनी या मार्गावरील एक पूल भुसुरूंग स्फोटाने उडवला. माओवाद्यांनी ताफ्याचा ताबा घेतला. यावेळी एका गाडीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार महेंद्र कर्मा दिसले. चार वर्षांपूर्वी माओवाद्यांविरोधात सलवा जुडूम आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे प्रनेते महेंद्र कर्मा साक्षात माओवाद्यांच्या समोर होते. माओवाद्यांनी महेंद्र कर्मा यांनी गाडीतून उतरवले. कर्मा यांनी आत्मसमर्पण केलं पण माओवाद्यांनी दाद दिली नाही आणि कर्मा यांची जागेवरच गोळ्या झाडून हत्या केली.माओवाद्यांच्या या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांना 3 गोळ्या लागल्या असून 15 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा शोधाशोध सुरू झाला तेव्हा लक्षात आले की माओवाद्यांनी त्यांचं अपहरण करून सोबत जंगलात घेऊन गेलेत. या हल्ल्यात दोन आमदार जखमी झाले आहेत. विद्याचरण शुक्ल यांना जगलपूरच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याचंं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेसनं आपली परिवर्तन यात्रा रद्द केली असून उद्या छत्तीसगड बंदचं आव्हान केलंय. तर काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. हा हल्ला म्हणजे लोकशाही मुल्यांवरचा हल्ला असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. कोण होते महेंद्र कर्मा ?-महेंद्र कर्मा हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते.- 2003 ते 2008 महेंद्र कर्मा हे छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.- 2000 ते 2004 साली अजित जोगी यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग आणि वाणिज्य खात्याचे मंत्री होती. -2005 मध्ये त्यांनी माओवाद्यांविरोधात सलवा जुडुम नावाची चळवळ सुरू केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2013 03:41 PM IST

नक्षली हल्लात काँग्रेस नेत्यांसह 16 ठार

छत्तीसगढ 25 मे : छत्तीसगडमधल्या बस्तर भागात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी आज संध्याकाळी साडेचार वाजता केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार आणि छत्तीसगडचे माजी गृहमंत्री महेंद्र कर्मा यांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे माजी आमदार उदय मुदलीयार यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल गोळीबारात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर आत्ता जगदलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

एअर ऍम्ब्युलन्स मिळाल्यावर त्यांना रायपूरला हलवलं जाईल. तर तिकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांचं माओवाद्यांनी अपहरणही केलंय. काँग्रेसचे काही कार्यकर्तेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असण्याची भिती व्यक्त करण्यात येतेय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जण दगावलयाची भीती व्यक्त केलीय. सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाचं शिष्टमंडळ छत्तीसगढसाठी रवाना झालंय.

छत्तीसगडमध्ये या वर्षाअखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 12 एप्रिल रोजी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू करण्यात आली होती. आज परिवर्तन यात्रा पूर्ण करुन सुमारे 20 गाड्यांतून काँग्रेसच्या 150 नेते आणि कार्यकर्त्यांचा ताफा परत निघाला होता. छत्तीसगडमधल्या घनदाट जंगलामध्ये जिरमघाटी इथं हा ताफा पोहचला त्यावेळी नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित कटानुसार इथं भूसुरुंग वापरुन हल्ला केला. या स्फोटामुळे एकच गोंधळ उडाला. लपून बसलेल्या माओवाद्यांनी ताफ्याला घेरा घातला आणि बेछुट गोळीबार सुरू केला.

संध्याकाळी सव्वाचार ते साडे सहा वाजेपर्यंत हा हल्ला सुरू होता. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा प्रतिकार तोकडा पडला. त्यांच्या जवळच्या गोळ्या संपल्यामुळे माओवाद्यांनी थेट ताफ्यावर हल्लाबोल केला. मदतकार्य पोहचू नये म्हणून माओवाद्यांनी या मार्गावरील एक पूल भुसुरूंग स्फोटाने उडवला. माओवाद्यांनी ताफ्याचा ताबा घेतला. यावेळी एका गाडीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार महेंद्र कर्मा दिसले. चार वर्षांपूर्वी माओवाद्यांविरोधात सलवा जुडूम आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे प्रनेते महेंद्र कर्मा साक्षात माओवाद्यांच्या समोर होते. माओवाद्यांनी महेंद्र कर्मा यांनी गाडीतून उतरवले. कर्मा यांनी आत्मसमर्पण केलं पण माओवाद्यांनी दाद दिली नाही आणि कर्मा यांची जागेवरच गोळ्या झाडून हत्या केली.

माओवाद्यांच्या या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांना 3 गोळ्या लागल्या असून 15 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा शोधाशोध सुरू झाला तेव्हा लक्षात आले की माओवाद्यांनी त्यांचं अपहरण करून सोबत जंगलात घेऊन गेलेत. या हल्ल्यात दोन आमदार जखमी झाले आहेत. विद्याचरण शुक्ल यांना जगलपूरच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याचंं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेसनं आपली परिवर्तन यात्रा रद्द केली असून उद्या छत्तीसगड बंदचं आव्हान केलंय. तर काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. हा हल्ला म्हणजे लोकशाही मुल्यांवरचा हल्ला असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

कोण होते महेंद्र कर्मा ?

-महेंद्र कर्मा हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते.- 2003 ते 2008 महेंद्र कर्मा हे छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.- 2000 ते 2004 साली अजित जोगी यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग आणि वाणिज्य खात्याचे मंत्री होती. -2005 मध्ये त्यांनी माओवाद्यांविरोधात सलवा जुडुम नावाची चळवळ सुरू केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2013 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close