S M L

'बदला घेण्यासाठी काँग्रेस यात्रेवर हल्ला'

छत्तीसगड 28 मे : येथील बस्तर भागात शनिवारी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं घेतली आहे. तसं पत्रक त्यानं बीबीसीला पाठवलंय. उसेंडी हा नक्षलवाद्यांचा प्रवक्ताही आहे. नक्षलविरोधी सलवा जुडुमचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा, तसंच प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल हेच या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, असं नक्षलवाद्यांच्या पत्रात म्हटलं आहे. या हल्ल्यात निरपराध काँग्रेस कार्यकर्तेही मारले गेले याबद्दल नक्षलवाद्यांनी खेद व्यक्त केलाय. शनिवारी माओवाद्यांनी जिरमघाटीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात कर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर नंदकुमार पटेल आणि त्याच्या मुलाचं अपह्ररण करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल गंभीर जखमी झालेत त्याच्यावर अजून उपचार सुरू आहे. या हल्ल्यात 29 जणांना आपला जीव गमावावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2013 10:19 AM IST

'बदला घेण्यासाठी काँग्रेस यात्रेवर हल्ला'

छत्तीसगड 28 मे : येथील बस्तर भागात शनिवारी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं घेतली आहे. तसं पत्रक त्यानं बीबीसीला पाठवलंय. उसेंडी हा नक्षलवाद्यांचा प्रवक्ताही आहे.

नक्षलविरोधी सलवा जुडुमचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा, तसंच प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल हेच या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, असं नक्षलवाद्यांच्या पत्रात म्हटलं आहे. या हल्ल्यात निरपराध काँग्रेस कार्यकर्तेही मारले गेले याबद्दल नक्षलवाद्यांनी खेद व्यक्त केलाय.

शनिवारी माओवाद्यांनी जिरमघाटीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात कर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर नंदकुमार पटेल आणि त्याच्या मुलाचं अपह्ररण करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल गंभीर जखमी झालेत त्याच्यावर अजून उपचार सुरू आहे. या हल्ल्यात 29 जणांना आपला जीव गमावावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2013 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close