S M L

रामलिंग राजू यांची शरणागती

9 जानेवारी सत्यमचे पदच्युत अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आंध्रप्रदेश पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. डीजीपी कार्यालयात त्यांनी शरणागती पत्करली. राजू यांच्या भावाला रामराजू याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सत्यमचे सीएफओलाही अटक केली जाणार आहे.दरम्यान, सत्यम महाघोटाळ्याबाबत सरकार लवकरच कडक कारवाई करणार आहे. कंपनीचं काम सुरळीत रहावं यासाठी सद्याचं बोर्ड बरखास्त करून हंगामी बोर्ड बनवण्याच्या विचारात सरकार आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज' नंही सत्यमच्या सगळ्या खात्यांवर जप्ती आणली आहे.सेबीनंही राजू यांच्यावर चौकशीचं समन्स बजावले आहेत. सेबीच्या टीमनं "सत्यम सिटी सेंटर" या सत्यमच्या जुन्या कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्रं जप्त केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 05:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close