S M L

जॉनचा 'आशायें' वादाच्या भोवर्‍यात

10 जानेवारी, मुंबईदोस्ताना या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली. पण सिनेमाला मिळालेल्या यशाचा जॉन अब्राहमला फारसा फायदा झाला नाही असं दिसतंय. कारण त्याचा आगामी आशायें हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वाद निर्माण झाले आहेत.जॉन अब्राहमच्या आगामी आशायें या सिनेमाचा दिग्दर्शक आहे नागेश कुकूनूर. पण बिग पिक्चर्सने हा सिनेमा व्यावसायिक नसल्याचं कारण देत तो आम्ही प्रदर्शित करणार नाही असं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी आशायेंच्या निर्मात्यांना कोर्टात खेचलंय. वितरक असलेल्या बिग पिक्चर्सचं म्हणणं आहे की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सिनेमा बनलेला नाही. तो व्यावसायिक असण्यापेक्षा कलात्मक जास्त आहे. त्यामुळेच आता निर्माते टी सिरीज आणि परसेप्ट पिक्चर्स कंपनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. निर्माते कायदेशीर मार्गाने जाऊ पाहतायत तरी त्यांचा दावा आहे की आशायें हा कोणत्या पद्धतीचा सिनेमा आहे याची बिग पिक्चर्सना आधीपासून कल्पना होती. "हा नागेश कुकनूरचा सिनेमा आहे, आणि त्यात जॉन अब्राहम आहे.. बिग पिक्चर्स आता ऍग्रीमेंटमधल्या गोष्टी विसरलेय असंच दिसतंय." अशी प्रतिक्रिया परसेप्ट पिक्चर कंपनीचे सीईओ नवीन शाह यांनी दिली.जुलै 2008मध्ये आशायें रिलीज होणार होता. पण त्यादरम्यान जॉन आपल्या भावाच्या लग्नात बिझी होता.. त्यामुळे सिनेमाचं रिलीज पुढं ढकलण्यात आलं.. आणि आता निर्माते आणि वितरक यांच्यातील कायदेशीर युद्धामुळं जॉनला सिनेमाच्या रिलीजची वाट पहावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2009 07:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2009 07:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close