S M L

जेडीयू-भाजपमध्ये फारकत ?

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2013 10:40 PM IST

जेडीयू-भाजपमध्ये फारकत ?

नवी दिल्ली 12 जून : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपनं प्रचार प्रमुखपदी निवड केल्यानंतर भाजप आणि जेडीयूदरम्यानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजप आघाडी लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी संध्याकाळी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये अपक्ष आमदारांना स्वतःच्या बाजूनं वळवण्याविषयी नेत्यांना सांगण्यात आलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार एक नवीन फेडरल फ्रंट उभारण्याच्या तयारीत लागले आहे. यामध्ये ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सहभागी असतील. नितीशकुमार यांच्या मते या तिन्हीही राज्यांना विशेष दर्जा मिळला पाहिजे. याच मुद्यावर तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र येत आहे. नितीशकुमार या अगोदर बीजेडीच्या रॅलीला पाठिंबा दिला होता.

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आज विशेष दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत रॅली आयोजित केली आहे. नितीशकुमार यांनी जेडीयूचे संसदीय सदस्य के.सी.त्यागी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेण्यासाठी पाठवले आहे.

जेडीयूच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जर ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री एकत्र आले तर येणार्‍या निवडणुकीत भाजप अथवा काँग्रेसचे सरकार आले तर सत्ता स्थापनेसाठी फेडरल फ्रंड महत्त्वाची भूमिका बजावतील. आणि आपली मागणी पूर्ण करून घेतील.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी लालकृष्ण अडवाणींची समजूत काढली याचा अर्थ संघ भाजपच्या कारभारात हस्तक्षेप करत असतो, असा होत नाही, असं भाजपचे नेते राम माधव यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2013 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close