S M L

लालूप्रसाद यादव चालले जपानला

11 जानेवारी दिल्लीसद्या निवडणुकींच्या तयारीसाठी नेत्यांची धावपळ उडाली आहे. पण रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव या धावपळीपासून दूर आहेत. सध्या रेल्वेमंत्री ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणा-या बुलेट ट्रेनचं स्वप्नं पाहत आहेत. त्यासाठीच जपान दौ-यावर जाण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. याआधी लालूंनी आग्रा आणि दिल्ली दरम्यान 150 किलोमीटर वेगानं धावणा-या शताब्दी ट्रेनचं स्वप्न दाखवलं होतं. ते अजूनही अपूर्णच आहे. खरं तर 300 किलोमीटर वेगानं आपल्या देशात ट्रेन धावणं अवघड आहे, असं अधिका-यांचं मत आहे. पण सध्या लालू त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. जपान दौ-यावर लालूंच्यासोबत रेल्वे राज्यमंत्री आर. वेलू , परराष्ट्र राज्यमंत्री ई. अहमद हे मंत्री आणि काही वरिष्ठ अधिकारीही जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 04:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close