S M L

ठाण्यातल्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार

14 जानेवारी, ठाणेविनय म्हात्रे 2009 पर्यंत देशातल्या लांब पल्ल्यांच्या गाड्या 26 डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबीही वाढवण्यात येणारेय. ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मची लांबी सध्या फक्त 16 डब्यांच्या गाड्यांपुरती आहे. पण आता ठाणे रेल्वे स्टेशनची लांबी वाढवण्यात येणार असल्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे.ठाणे शहर एक वाढत शहर, वाढती लोकसंख्या, यामुळे शहरातील वाहतूकीवर वाढता ताण, अशा मध्येच ठाणे करांची जिवन वाहिनी बनलीय ती रेल्वे. सर्वच जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकांचा वास्तव्य ठाण्यात आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या सर्वच गाड्या ठाण्यात थांबाव्यात ही मागणी तर नित्याचीच आहे. सध्या ठाणे स्थानकात पंधरा डब्याचीच गाडी थांबू शकते. 19 डब्याची गाडी थांबवायची म्हटलं तर ती दोन वेळा तीला मागे पुढे करावी लागते. अशा मध्येच आता देशातील सर्वच गाड्या 26 डब्याच्या केल्या जाणार आहेत. यामुळे ठाणेकरांची मोठी पंचाईतच आहे. पण ठाणेकरांनो घाबरण्याचं काम नाही. कारण आता ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू होणार आहे. याविषयी ठाण्याचे खासदार आनंद परांजपे म्हणाले, " ठाण्यातल्या प्लॅटफॉर्मनंबर 5 आणि 6 ची लांबी 615 मीटर करण्यात येणार आहे. त्यामुळे कुर्ल्यावरून सुटणा-या सगळ्या ट्रेन ठाण्यात थांबवणं सोयीचं जाणार आहे." प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ठाणेकरांच्या दिमतीला मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन धावून आली आहे. , या कॉर्पोरेशनच्या फंडातूनच बाराशे कोटी रुपये खर्चून ठाण्यातल्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविली जाणार आहे.मात्र सर्वात जास्त उत्पन्न देणार्‍या मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागण्याकडे नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातं, अशी ओरड नागरिकांकडून होत आहे. त्याविषयी आनंद परांजपे म्हणाले, " संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांची रेल्वे लाईफ लाईन आहे. ठाण्यात सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असून आम्ही रेल्वे कॉर्पोरेशना सर्वात जास्त महसूलही मिळवून देतो. त्यामुळे आम्ही आमचा हक्क मागतोय. त्यामुळे त्यांनी सुविधा देणं गरजेचं आहे." ठाण्यातल्या स्थानकांची लांबी वाढवल्यानंतर उत्तर, मध्य आणि दक्षिण भागात जाणार्‍या बहुतांश गाड्या ठाण्यात थांबण्याच्या शक्यता आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 05:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 05:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close