S M L

प्रिया दत्त यांचा यू टर्न

14 जानेवारी, मुंबईसंजय दत्तच्या समाजवादी पक्षाची कास धरल्यानं प्रिया दत्त त्याच्यावर रागावल्या होत्या. ' हा दिवस पाहण्यासाठी सुनील दत्त जीवंत नाहीयेत, तेच चांगलं आहे, अशा तीव्र शब्दात त्यांनी संजय दत्तवर नाराजी व्यक्त केली होती. संजय दत्तचं सपात जाणं ही काँग्रेसच्या बाजूनं धक्कादायक बाब आहे. प्रिया दत्त यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी यु टर्न घेतला. त्या पत्रकार परिषदेत प्रिया दत्त म्हणाल्या, " संजयनं सपात प्रवेश करणं हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. याबाबतीत त्याचं माझ्याशी आणि माझं त्याच्याशी काहीच बोलणं झालेलं नाहीये. संजयचं राजकारणात प्रवेश करण्याची बातमी मजा मीडिया आणि अमरसिंग यांच्या वक्तव्यावरून कळली आहे. संजय जरी माझा भाऊ असला तरी तो स्वत: स्वतंत्र व्यक्ती आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकाला स्वत:ची मत आहेत. मी कधीच माझे कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही आणि यापुढेही करणार नाही. आणि कोणाच्या निर्णयामध्ये आडकाठी आणणार नाही. पण माझी धारणा शेवटपर्यंत काँग्रेसशीच राहणार आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. संजयच्या कोणत्याही निर्णयात माझां पाठिंबा असणार आहे, " असं प्रिया दत्त पत्रकार परिषदेत म्हणाल्या. प्रिया दत्त यांचा युटर्न हा खरोखरच धक्का दायक आहे. कारण यापूर्वीची परिस्थिती जरा वेगळी होती. संजय दत्तच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी समाजवादी पक्षानं ही खेळी खेळून त्याला लखनऊमधून उमेदवारी देण्याचं जाहीर केलं. पण सुप्रीम कोर्टातून संजय दत्तच्या शिक्षेला स्थगिती मिळेल की नाही, हे जेव्हा अनिश्चित झालं तेव्हा समाजवादी पक्षाचा डाव फसल्यासारखा झाला. पण काँग्रेसमध्ये मात्र याबाबत नाराजी निर्माण झाली आहे. संजय दत्तला तिकीट द्यायचं की नाही यावर विचार चालला होता. 2004 साली संजय दत्तनं काँग्रेस तर्फे निवडणूक लढवावी यावर काँग्रेसमधून सकारात्मक प्रतिसाद आला होता. पण सपातर्फे संजय दत्तची उमेदवारी अचानक जाहीर होणं काँगेससाठी धक्का होता. कारण सुनील दत्त कुटुंबाची काँग्रेसशी जवळीक आहे. प्रिया दत्त स्वत: काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत. 1984पासून सुनील दत्तही काँग्रेस पक्षात होते. समाजवादी पक्षानं संजय दत्तला असं अचानक हायजॅक केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण होतं. याचा परिणाम म्हणून प्रिया दत्त या आता उघडपणे संजय दत्तच्या विरोधात बोलत होत्या. काँग्रेस प्रिया दत्तना पुढे करून सपाच्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रिया दत्त यांनी मान्यतावरही टीका केली आहे. मान्यतामुळे संजयनं असं केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या प्रकरणात फॅमेली ड्रामा आहे. मान्यता आणि प्रिया दत्त यांनी उघडपणे एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मात्र संजय दत्त असंही म्हणू शकतो की हा त्यांचा आंतर्गत प्रश्न आहे. पण तो जाहिरपणे काय बोलतो याकडेही सर्वांचं लक्ष आहे. एक मात्र नक्की की सुनील दत्त यांच्या कुटुंबातला वाद आता या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे. समाजवादीपक्षाच्या तिकीटवरुन, लखनौमधून निवडणूक लढवण्याचा,संजयचा निर्णय व्यक्तिगत असल्याचं उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंग यांनी म्हटलंय. संजय आणि समाजवादी पक्षाच्या संबंधामुळं प्रिया दत्त दुखावणे स्वाभाविक आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. " संजय दत्तच्या येण्यानं समाजवादी पार्टीला आनंद होणार आहे. समाजवादी पार्टी संजय दत्तचं स्वागत करत आहे, " अशी प्रतिक्रिया सपाचे खासदार अबू आझमी यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 08:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close