S M L

फेमिनातर्फे देशात टॅलेन्ट सर्च

14 जानेवारी नागपूरफेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 2009 साठी देशभरात टॅलेन्ट सर्च सुरू आहे. याच सत्रात नागपुरातून दोन मुलींची निवड पुढच्या टप्यासाठी झाली आहे.या मुलींची निवड करण्यासाठी 2008ची मिस इंडिया युनिव्हर्स सिमरन कौर मुंदी नागपुरात आली होती. सिमरनला या निवडींबद्दल विचारलं असता ती म्हणाली ह्या मुलींच्या निवडीबद्दल मी खूश आहे. मला आशा आहे की ह्या मुली फायनलपर्यंत जातील आणि नागपूरचं नाव मोठं करतील. 2008 मिस युनिव्हर्स स्पर्धेबद्दल तिला विचारलं असता ती म्हणाली, त्या स्पर्धेतला अनुभव वेगळाचं होता. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे त्याबळावर तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकता.मुंबई, दिल्ली वगळता नागपूरातही चांगलं टॅलेंट आहे हे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आलं.निवड झालेल्या मॉडेल्सपैकी पिनाज म्हणाली, मी पहिल्याच वेळी ह्या स्पर्धेत भाग घेतला आणि माझी निवड झाली त्यामुळे आनंद वाटतोय. आता पुढील स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे जास्त मेहनत करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 09:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close