S M L

युवक काँग्रेस कार्यकारिणीत नेत्यांच्या मुलांचा भरणा

15 जानेवारी, दिल्लीआशिष दीक्षितमहाराष्ट्र युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी बुधवारी संध्याकाळी जाहीर झाली. या यादीत विलासराव देशमुख, पतंगराव कदम आणि विलास मुत्तेमवार यांच्यासारख्या जेष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मुलांनीच महत्त्वाची पदे पटकावली आहेत. त्यांमुळे राहुल गांधीच्या कॉग्रेसमध्येही घराणेशाहीला पर्याय नाही हे सिद्ध झालंय. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वीच मान्य केल होतं, की माझं आडनाव जर गांधी नसतं तर मी इथवर पोहचू शकलो नसतो. तशीच काहीशी अवस्था महाराष्ट्र युवक कॉग्रेसची आहे. सात उपाध्यक्षांमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांचा समावेश केला गेलाय. तर वीस सरचिटणीसांमधये काँग्रेसचे निलंबित नेते रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख आणि केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांची वर्णी लागलीय. या शिवाय अनेक नेत्यांच्या मुलांचा नंबर या यादीत लागला आहे.पण यात काहीही गैर नसल्याचं राज्य युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना वाटतं. "52 जणांच्या यादीमध्ये जेमतेम 4-5 नेत्यांच्या मुलांची वर्णी लागली आहे. आणि ही मुलं खरोखर काम करत आहेत. केवळ एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा किंवा मुलगी असणं, हे काही पद नाकारण्यासाठी कारण असू शकत नाही." असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी सांगितलं राहुल गांधी आता राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येतायेत. त्यांनी महाराष्ट्र आणि जम्मू काश्मिरला तरुण मुख्यमंत्री मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली. भावी पंतप्रधान म्हणूनही त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे आपोआपच राहुल गांधींच्या नियंत्रणात असलेल्या युवक काँग्रेसचं महत्त्वही वाढलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश मतदार पस्तीस वषांर्पेक्षा कमी वयाचे असतील. या तरुण मतदारांना तरुण उमेदवार देण्याचा विचार कॉग्रेस करत आहे. पण ही उमेदवारी मिळवण्यासाठीही वडिलांची पुण्याई हा महत्त्वाचा निकष ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2009 07:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close