S M L

उत्तराखंडमध्ये पावसामुळे बचावकार्यात अडथळे

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2013 04:06 PM IST

उत्तराखंडमध्ये पावसामुळे बचावकार्यात अडथळे

24 जून :उत्तरांखडामध्ये आज सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावलीय. राज्यात डोंगरपायथ्याशी मुसळधार तर माथ्यावर मध्यम पाऊस होतोय. खराब हवामान आणि पुन्हा सुरू झालेला पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येताहेत. जॉली ग्रँट विमानतळावर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे एकीकडं घड्याळ आणि दुसरीकडं आकाशातले ढग याकडं लक्ष ठेवून लष्कर आणि आयटीबीपीचे जवान मदतकार्यामध्ये गुंतलेत. गुप्तकाशीमध्ये आधीच पाऊस सुरू झालाय.

राज्यात डोंगरांच्या पायथ्याशी आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. रुद्रप्रयाग आणि गुप्तकाशीमध्ये आणखी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. डोंगरमाथ्यांवरही मध्यम ते कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालही राज्यात सर्वत्र पाऊस पडला. लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनी आतापर्यंत 80 हजार जणांची सुटका केली.तर अजून 4500 लोक अडकले. सध्या जमिनीवरून मदत आणि बचतकार्य सुरू आहे.

मात्र, हवाई मार्गाने मदतकार्यात अडथळे येत आहेत. आता बद्रीनाथमध्ये अडकलेल्या 4500 जणांची सुटका करण्याचं आव्हान लष्करासमोर आहे. दरम्यान, लष्करानं लंबागढमध्ये बद्रीनाथ आणि जोशीमठला जोडणारा तात्पुरता पादचारी पूल बांधलाय. बद्रीनाथमध्ये अडकलेल्या लोकांनी या पूलाचा वापर सुरू केलाय. दुसरीकडे, केदारनाथमध्ये ठार झालेल्या यात्रेकरूंवर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भविष्यात मृतांची ओळख पटवण्यात अडचण येऊ नये म्हणून त्यांचे फोटो आणि डीएनए गोळा करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2013 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close