S M L

पाकनं कारवाई करून दाखवावी - प्रणव मुखर्जी

16 जानेवारी पाकिस्ताननं जमातवर कारवाई केली असल्याचा दावा केला आहे. पण तो दावा भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला आहे. ' पाकिस्ताननं राजकीय मार्गानं प्रतिक्रिया द्यावी, प्र्रसारमाध्यमांतून नव्हे, ' असं परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. " परदेशी नेत्यांच्या भेटीमुळे भारताच्या संयमात वाढ झाल्याचं दिसतं असल्याचे प्रणव मुखर्जी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते. या मुलाखतीत त्यांनी भारताच्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांना पाकिस्ताननं भारताच्या हवाली केलं नाही तरी पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर खटले चालवावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कारण संयुक्त राष्ट्रानं जमातवर निर्बंध घातल्यानंतरही त्या दहशतवादी संघटनेचं कार्य दुसर्‍या नावाखाली सुरूच आहे. पण पाकिस्तान त्यावर काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण एकीकडे पाकिस्तानमध्ये जमात-उद-दावा प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं पाकिस्ताननं पहिल्यांदाच मान्य केलं आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रेहमान मलिक यांनी ही कबुली दिली आहे. असे पाच कॅम्प्स बंद केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. लष्करच्या 124 अतिरेक्यांना अटक केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यात जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदचाही समावेश आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यानची युद्धाची भाषा आता थोडीशी मवाळ झाल्याचं दिसत आहे. " भारताशी सहकार्य करण्याची ही वेळ आहे, " असं पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रहमान मलिक म्हणाले. जमात-उद-दावाविरोधातली कारवाई सुरूच राहील, असं आश्वासन पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रहमान मलिक यांनी दिलं आहे. " आम्ही जमातचे पंजाब आणि आझाद काश्मीरमधले 20 ऑफिस, 2 ग्रंथालयं, 87 शाळा, 7 मदरसा आणि पाच कॅम्प्स बंद केलेत, "अशी ग्वाही पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रहमान मलिक यांनी दिली आहे. असं असूनही जोपर्यंत पाक राजकीय मार्गानं प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत भारत पाकवर विश्वास ठेवणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2009 06:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2009 06:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close