S M L

उत्तराखंड : बचावकार्य अंतिम टप्प्यात

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2013 10:32 PM IST

javan44428 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रल्यानंतर बचावकार्य आता अंतिम टप्प्यात आलं आहे. खराब हवामान निवळल्यानंतर 17 हेलिकॉप्टर्सच्या साहय्यानं वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम लष्काराचे जवान करत आहे. पुरग्रस्त भागात अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरुच राहणार असल्याचं लष्करप्रमुखांनी सांगितलंय.

बद्रीनाथमध्ये अद्याप अडीच हजार लोक अडकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तसंच हर्षीलमध्येही काहीजण अडकले असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत लष्कर, निमलष्करी दलं,आणि इतर संस्थांच्या प्रयत्नांमधून एक लाखाहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मदतकार्यादरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात  शहीद झालेल्या 20 जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. दरम्यान, उत्तराखंडमधल्या पर्यटनाला नव्यानं चालना देण्यासाठी सरकारनं 95 करोडचं विशेष पॅकेज जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2013 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close