S M L

इशरत जहाँ एन्काउंटर बनावटच

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2013 11:14 PM IST

Image ishrat_300x255.jpgनवी दिल्ली 03 जुलै : देशभर गाजलेल्या इशरत जहाँ बनावट चकमकी प्रकरणी सीबीआयने आज पहिलं आरोपपत्र सादर केलंय. या आरोपपत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे सीएनएन आयबीएनच्या हाती लागले आहेत. गुजरात पोलिसांनी कट रचून इशरत आणि इतर तीन तरुणांची हत्या केल्याचं या आरोपपत्रात म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांच्याविरोधात ठोस पुरावे न मिळाल्यानं या टप्प्यात त्यांचं नाव आरोपपत्रात नाही.

 

गुप्तचर विभागाचे स्पेशल डिरेक्टर राजिंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीवरूनच ही चकमक झाल्याचा आरोप आहे. पण, सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रात त्यांच्या नावाचाही समावेश नाही. 15 जून 2004 ला अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी गुजरात पोलिसांनी केलेल्या चकमकीत 19 वर्षांची इशरत आणि तिच्याबरोबर असलेल्या 3 तरुणांचा मृत्यू झाला होता.

 

इशरत ही लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेची सदस्य आहे आणि नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तिला पाठवण्यात आल्याच्या संशयावरून ही चकमक करण्यात आली होती. पण, सर्वात आधी गुजरातच्या मेट्रोपोलिटन कोर्टाने ही चकमक बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर गुजरात हायकोर्टाच्या आदेशावरून आधी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी आणि त्यानंतर सीबीआयाने या प्रकरणी तपास केला. इशरत आणि लष्कर-ए-तोयबाचा काहीही संबंध या दोन्ही तपास संस्थाना आढळला नाही.

सीबीआयच्या या आरोपपत्रातले महत्त्वाचे सवाल

 • 19 वर्षांची इशरत जहाँ अतिरेकी होती का?
 • इशरत बरोबर असलेले तीन मुलं अतिरेकी होते का?
 • इशरत 11 जून 2004ला महाराष्ट्रात होती. तिचा गुजरातशी काहीही संबंध नसताना अचानक 15 जून रोजी ती गुजरातमध्ये कशी पोचली?
 • गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना इशरतच्या चकमकीबाबत माहिती होती का?
 • इशरत आणि इतर तिघांना पोलिसांनी आधी अटक केली आणि नंतर कट रचून त्यांची हत्या करण्यात आली का?

 

आरोपी पोलीस अधिकारी

 • पी. पी. पांडे, एडीजीपी
 • डी. जी. वंझारा, डीआयजी
 • जी. एल. सिंघल, एसीपी
 • तरूण बारोट, डेप्युटी एसपी
 • एन. के. अमीन, डेप्युटी एसपी
 • अंजू चौधरी, एसआरपी कमांडो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2013 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close