S M L

इंडियन ऑफ द इयर पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा

19 जानेवारी, दिल्लीसीएनएन-आयबीएनच्या इंडियन ऑफ द इयर ऍवॉर्ड या पुरस्काराच्या नामांकनांची नुकतीच घोषणा झाली. ज्या राजकीय नेत्यानं आपल्या कार्याद्वारे कित्येक लोकांचं आयुष्य बदलवून टाकलं आहे, अशा राजकीय नेत्यालाही या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेनं चांगलं प्रशासन देणार्‍यांकडे सत्ता सोपवली. त्यामुळे 2008 साली तीन मुख्यमंत्र्याना त्यांच्या कामगिरीची पोच पावती मिळाली. आणि ते पुन्हा सत्तेवर आले. यावेळी जनतेनं बॉम्बस्फोटांचं राजकारण होऊ दिलं नाही.अणुकराराच्या दरम्यान संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. देशातील सहा जणांनी गेल्या वर्षीचं राजकारण गाजवलंआणि त्यांनाच इंडियन ऑफ द इयरचं नामांकन मिळालं आहे. इंडियन ऑफ द इयर ऍवॉडमध्ये पहिलं नामांकन मिळालंय नितीश कुमार यांना. जर कर्तृत्व आणि शांतता याची सांगड घालायची झाली तरनितीशकुमारांचं नाव घ्यावं लागेल. बिहारमध्ये आजपर्यंत एवढी शांतता कधीच नांदली नसेल. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यावर हे राज्य आता हळुहळु शांततेनं विकासाकडे वाटचाल करतंय. आता या राज्याचा लढा सुरू आहे तो गरिबी ,भ्रष्टाचार, निरक्षरता आणि गुन्हेगारीसोबत. याच वर्षी जम्मू आणि काश्मीरला ओमर अब्दुल्ला नावाचा सर्वात तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री मिळाला..मात्र त्याचं यश हे काही अब्दुल्ला कुंटुंबाकडून मिळालेली भेट नव्हे. तर ओमर यांनी केलेल्या 45 दिवसांच्या प्रचार यात्रेचा हा परिणाम आहे. विश्‍वास दर्शक ठरावाच्या वेळी ओमर यांनी केलेलं भावस्पर्षी भाषण आजही भारतीयांच्या स्मरणात आहे.काँग्रेस पक्ष आणि सरकारमधला महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रणव मुखर्जी. युपीए सरकारचा तारणहार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.डाव्या पक्षांना सांभाळण्याच्या त्यांच्या कसबामुळं युपीए सरकार बर्‍याच वेळी वाचलं. अणुकरार प्रकरणी स्थापन केलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सन्मन्वय समितीचे अध्यक्ष होते. आणि मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते पाकिस्तानवर सतत दबाब आणण्याचा प्रयत्न करतायत.छत्तीसगढमध्ये चारही बाजूने उच्छाद मांडलेल्या नक्षलवाद्यांना पहिल्यादांच एवढा कडक मुख्यमंत्री मिळाला असेल रमण सिंग. रमण सिंग यांनी विकासकामांच्या जोरावरच दुसर्‍यांदा या राज्याची सूत्रं हाती घेतली आहेत. दिल्लीच्या राजकारणात कडक आणि दूरदृष्टी असलेल्या महिला राजकारणी म्हणून शिला दिक्षीत यांचं नाव घेतलं जातं. दिल्लीमध्ये आपल्या कर्तृत्वानं त्यांनी सर्व पुरुष राजकारण्यांवर मात केलीय, असंच म्हणावं लागेल. त्यांनंी विकासकामांवर तिसर्‍यांदा दिल्ली जिंकली आहे. मध्यप्रदेशसारख्या राज्यात दुसर्‍यांदा सत्ता कामय राखणं हे काही सोपं नव्हतं. मात्र सतत लो प्रोफाईल राहणारे शिवराज चौहान यांनी आपल्या कामाद्वारे हे साध्य करुन दाखवलं आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्याला सुरुवात केली आहे. तुमच्या मते इंडियन ऑफ द इयर कोण आहे. तुमची मतं नोंदवण्यासाठी आम्हाला एसएमएस करा IPOL आणि पाठवून द्या 52622वर. त्याचबरोबर आमच्या वेबसाई ibnlive.com वर नोंदणी करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2009 09:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2009 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close