S M L

सत्यमकडे 150 कोटींचीच जमा

20 जानेवारी, मुंबई सत्यमकडे सरकारी , विदेशी आणि खाजगी बँकामधली खाती मिळून फक्त दीडशे कोटींचीच जमा असल्याची माहिती अर्थमंत्रालयाला सूत्रांकडून मिळालीये. मंत्रालयाच्या सूत्रांना अशीही माहिती मिळालीय की सरकारी बँकाचे पैसे प्रत्यक्ष सत्यममध्ये अडकलेले नसले तरी सत्यमच्या इतर उपकंपन्यांमध्ये मात्र सरकारी बँकाची गुंतवणूक आहे. सत्यमला सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज आहे आणि ही गरज पूर्ण होण्यासाठी अंदाजे 1100 कोटी रुपये लागणार आहेत . यातले 500 कोटी तर फक्त कर्मचार्‍यांचा जानेवारीतला पगार देण्यासाठीच लागणार आहेत. सत्यमच्या सीईओ पदासाठी 40 अर्ज आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय आणि ही निवड येत्या 10 दिवसांत केली जाणार आहे. सत्यमकडून बँकाना लिहिलेल्या पत्रांमधून सत्यमनं खोट्या एफडीज्‌ची बतावणी केल्याचंही समजलंय. एकूणच सत्यम आणि मेटाज या दोन्ही कंपन्यांमधून हा घोटाळा पद्धतशीरपणे रचला गेला असंच म्हटलं पाहिजे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2009 11:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2009 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close