S M L

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचं आंदोलन

21 जानेवारी मुंबईजिजाऊ ब्रिगेडच्या 23 महिलांनी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुंबईतल्या घरात कोंडून घेतलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी हे आंदोलन केलं आहे. याबाबत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री शेळके सांगतात, 19 तारखेपासून जिजाऊ ब्रिगेडचं आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानात चालू आहे. महाराष्ट्रातील हजारो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तरी अजूनही या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा एकही मंत्री आला नाही. आपलं घरदार सोडून संपूर्ण महाराष्ट्रातून या महिला आलेल्या आहेत. कुणीच आपली दखल घेत नाही म्हणून या महिलांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि म्हणूनच त्यांनी मंत्र्याच्या घरात कोंडून घेतलं. आता जो पर्यंत मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करत नाही तो पर्यंत आम्ही घरातून बाहेर येणार नाही असं त्यांनी सांगितलं. घरातील कोणत्याही वस्तूंची नासधूस करण्याचा आमचा उद्देश नाही असं त्या म्हणाल्या. ज्या 23 महिलांनी हर्षवर्धन पाटलांच्या घरात कोंडून घेतलं आहे त्या जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी आहेत. ज्याप्रमाणे नांदेडला आयुक्तालय हलवण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी या महिलांची मागणी आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील आपल्या घराजवळ पोहचले आहेत आणि ते त्या महिलांशी बोलणी करत आहेत. तसेच महिला पोलीसही तिथे पोहल्या असून घरातील महिलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 10:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close