S M L

सत्यमच्या खरेदीसाठी परदेशी कंपन्यांमध्ये चढाओढ

21 जानेवारी, दिल्लीअंजुम तोमर, राजेश सिंहसत्यम कंपनीला खरेदी करण्यासाठी अनेक देशी विदेशी कंपन्या पुढे सरसावल्यात. त्यात लार्सन ऍन्ड ट्यूब्रो ही कंपनीसुद्धा पुढे सरसावली आहे.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगऴवारी दिल्लीत एल ऍन्ड टीच्या अधिकार्‍यांची बैठक झाली.आज मुंबईत या डीलविषयी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.लार्सन ऍन्ड टूब्रोेचे चेअरमन ए एम नायक यांनी मंगऴवारी दिल्लीत कॅबिनेट सेक्रेटरी, कॉर्पोरेट अफेअर्स सेक्रेटरी, पंतप्रधान कार्यालय आणि अर्थसचिवांची भेट घेतली. या भेटीत नायक यांनी सत्यम कंपनीच्या टेकओव्हरची इच्छा व्यक्त केली. सरकारही या प्रस्तावावर विचार करतंय. पण सध्या एल ऍन्ड टीला सत्यममध्ये केलेल्या गुंतवणूकीची चिंता असल्याचं ए एम नायक यांनी स्पष्ट केलं आहे. "सत्यममध्ये आम्ही 4 टक्के म्हणजे 475 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या तरी आम्हाला त्या 4 टक्क्यांची चिंता आहे." असं नायक म्हणाले.दुसरीकडे सत्यमला खरेदी करण्यासाठी अनेक देशी- विदेशी कंपन्या स्पर्धेत असल्याचं सत्यमचे बोर्ड मेंबर तरुण दास यांनी सांगितलं. मात्र याबाबतचा निर्णय तेवीस जानेवारीला होणार्‍या बैठकीत घेण्यात येईल. कंपनी सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं बोर्डचे सदस्य आणि अधिकारी ग्राहकांच्या सतत संपर्कात आहेत, असं तरुण दास यांनी स्पष्ट केलं आहे. "दुसरीकडे सत्यमला खरेदी करण्यासाठी अनेक देशी- विदेशी कंपन्या स्पर्धेत असल्याचं सत्यमचे बोर्ड मेंबर तरुण दास यांनी स्पष्ट केलंय. मात्र याबाबतचा निर्णय तेवीस जानेवारीला होणार्‍या बैठकीत घेण्यात येईल. कंपनी सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांचा विश्वास जिंकणं महत्वाचं असतं. त्यामुळे बोर्डचे सदस्य आणि अधिकारी ग्राहकांच्या सतत संपर्कात आहेत, असं तरुण दास यांनी स्पष्ट केलं आहे."आम्ही सत्यमच्या विक्रीबाबत चर्चा केली नाही, मात्र आमच्याकडे असे प्रस्ताव आले आहेत." असं तरुण दास यांनी सांगितलं.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एल ऍन्ड टी कंपनी सत्यमला त्यांच्या एल ऍन्ड टी इन्फोटेकमध्ये विलीन करण्याच्या विचारात आहे. पण कॉर्पोरेट मंत्रालयाच्या नुसार नवनियुक्त बोर्ड मेम्बर्स फक्त कंपनी चालवण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. कंपनी विकण्यासंदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार नव्या बोर्डाला नाही. त्यामुळं सत्यमच्या खरेदीसाठी एल ऍन्ड टीला कंपनी लॉ बोर्डाकडे जावं लागेल. त्याशिवाय सत्यमच्या शेअर होल्डर्सचीही परवानगी घ्यावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 12:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close