S M L

ओबामांना ग्वांटानामो तुरुंग बंद करायचाय

21 जानेवारी ओबामांनी ग्वांटानामोतल्या छळछावण्यांकडेही मोर्चा वळवलाय. या तुरुंगातल्या कैद्यांचे खटले 20 मेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश ओबामा प्रशासनानं दिलेत. यात 9/11 च्या कैद्यांचाही समावेश आहे. अमेरिकेनं या तुरुंगात गेल्या सात वर्षांपासून 700 च्या वर कैद्यांना डांबलंय. त्यापैकी अनेकांना विना चौकशीच डांबून ठेवण्यात आलंय. क्युबाजवळ असलेल्या ग्वांटानामोत अमेरिकेतला कुप्रसिद्ध तुरुंग आहे. याठिकाणी छळछावण्या आहेत. कॅम्प डेल्टा, कॅम्प इग्वाना आणि कॅम्प एक्सरे त्यात सुरुवातीला क्युबातल्या विस्थापितांना ठेवण्यात येत होतं. 2001 नंतर अफगाण आणि इराक युद्धातल्या कैद्यांना तिथं ठेवलं जाऊ लागलं. अल-कायदा तसंच तालिबानच्या अनेक अतिरेकी आणि नेत्यांना या छळछावण्यांत डांबण्यात आलं आहे. सरकारी आणि बिनसरकारी संस्थांनी या तुरुंगाबद्दल अनेकदा ओरड केली आहे. तिथल्या कैद्यांची शारीरिक आणि कायदेशीर स्थिती यावर या संस्थांनी टीका केली आहे. ग्वांटानामो तुरुंग बंद करण्याचं विधेयक तयार केलं आहे. पण, खरोखरच हा तुरुंग बंद करायचा असेल तर त्यात कायदेशीर गुंतागुंतही आहे. यासाठी ओबामा यांना अनेक मुद्यांना तोंड द्यावं लागेल. त्यापैकी 100 किंवा त्याहून अधिक खतरनाक कैद्यांचं काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर सुटकेसाठी पात्र ठरलेल्या 50 कैद्यांना दुसरीकडं हलवणं, जिथं या कैद्यांचा छळ होणार नाही अशा देशांत त्यांना ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आणि गुन्हेगारांवर कोणत्या प्रकारचे खटले चालवायचे याचा निर्णय घेणं असे अनेक प्रश्न ओबामांसमोर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 06:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close