S M L

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींना मोक्का

22 जानेवारी मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने सादर केलेली चार्टशीट कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. कायद्यानुसार 90 दिवसात चार्टशीट दाखल करणं बंधनकारक असतं त्यानुसार एटीएसने ती कोर्टात दाखल केली आहे. आरोपींच्या वकिलांनी त्यांना मोक्का लागत नाही असं कोर्टात म्हटलं होतं. पण एटीएसने भक्कम पुरावे सादर केल्यामुळे कोर्टाला चार्टशीट स्वीकारावी लागली.त्या चार्टशीटच्या आधारावर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आता मोक्का कोर्टात हा खटला चालवण्यात येणार आहे.29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव इथे मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जण ठार तर 101 जण जखमी झाले होते. हा स्फोट हिंदू अतिरेक्यांनी केल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं होतं. याप्रकरणी लष्करातील अधिका-यांचा हात असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे या बॉम्बस्फोटाच्या तपासानं खळबळ माजवून दिली होती. मालेगावच्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पसरल्याचं या तपासात उघड झालं. 29 सप्टेंबर 2008 रमझान ईदच्या आदल्या दिवशीची रात्र. रात्री 9 वाजून 35 मिनिटांची वेळ. मालेगाव शहरातील भिकू चौकात एका हॉटेलच्या शेजारी बॉम्बस्फोट झाला. एका मोटरसायकलमध्ये स्फोटकं ठेवून स्फोट घडवण्यात आला होता. स्फोट झाल्यानंतर एटीएसकडे तपास कार्य सोपवण्यात आलं.एकच धागा एटीएसकडं होता. तो म्हणजे स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल. तिचा घासलेला रजिस्ट्रेशन नंबर पोलिसांनी शोधला आणि देशातील हिंदू दहशतवादाचा बुरखा फाडला गेला. 23 ऑक्टोबर 2008 गुजरातच्या सुरत इथून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अटक झाली. मोटरसायकल प्रज्ञा सिंगची होती. साध्वीचा संबंध आरएसएसची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी होता. त्यानंतर इंदोरहून शिवनारायण कलसंग्रा आणि शामलाल साहू या दोघांना अटक झाली. त्यांच्या तपासातून एबीव्हीपीचा आणखी एक कार्यकर्ता समीर कुलकर्णीचं नावं पुढे आलं.पोलिसांनी त्यालाही अटक केली. पुण्यातून रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय याला अटक झाली. या दोघांकडून एटीएसला मालेगाव स्फोटाच्या कटाबाबत माहिती मिळाली. अभिनव भारत या संघटनेचा हात या स्फोटात असल्याचं उघड झालं. 2 नोव्हेंबर 2008 ला राकेश धावडे आणि अजय राहिरकरला अटक झाली. राहिरकर हा अभिनव भारतचा खजिनदार होता. तर धावडे ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन करणारा. दोघांकडून परदेशी बनावटीची रिवॉल्व्हर्स आणि दारुगोळा जप्त केला गेला. त्यांच्या माहितीवरून डोंबिवलीच्या जगदीश म्हात्रेला एटीएसनं पकडलं.5 नोव्हेंबर 2008 एटीएसनं भारतीय लष्कराचा अधिकारी आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला अटक केली. या अटकेनं प्रचंड खळबळ माजली. दहशतवादी कारवायात सेवेतील एका लष्करी अधिका-याला अटक होण्याची देशातली ही पहिलीच घटना होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बरखास्त केलेली अभिनव भारत संघटना पुरोहितनं पुन्हा सुरू केली हे तपासात उघड झालं. या संघटनेच्या कार्याध्यक्षा होत्या नथूराम गोडसेंची पुतणी हिमानी सावरकर. 12 नोव्हेंबरला एटीएसनं आणखी खळबळ उडवून दिली. स्वत:ला जम्मूच्या शारदापीठाचा शंकराचार्य म्हणवून घेणा-या सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडेला अटक करण्यात आली. मात्र एटीएसच्या या तपासानं संघपरिवारात प्रचंड खळबळ माजली. सुरुवातीला साध्वी प्रज्ञा सिंगशी संबंध असल्याचं संघानं नाकारलं. 28 ऑक्टोबर साध्वीच्या अटकेनंतर पाचच दिवसांनी शिवसेनेनं साध्वीच्या अटकेविरोधात मोहिम उघडली. मग भाजपचे नेते बोलू लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तर एटीएसच्या अधिका-यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. राजनाथ सिंग, वेंकय्या नायडू यासारख्या भाजपच्या नेत्यांनी एटीएसवर टीकेची राळ उडवली. हिमानी सावरकर यांनी मालेगावचा बॉम्बस्फोट ही हिंदूंची प्रतिक्रिया असल्याचं जाहिरपणे सांगितलं. कोर्टात येणा-या आरोपींवर फुलं उधळण्याचे प्रकार झाले. शिवसेनेने तर 26 नोव्हेंबरला एटीएसच्या तपासाविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली. दुदैर्व म्हणजे त्याच दिवशी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यांच्याशी लढताना एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे शहिद झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 11:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close