S M L

क्रीडा मंत्र्यांच्या सहीने लाखोंचा घोटाळा

22 जानेवारी मुंबईबनावट सहीने राज्य सरकारच्या तिजोरीतले पैसे, सरकारी अधिका-यांनीच उकळल्याचे उघडकीस आलं आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन क्रीडा मंत्री वसंत पुरके यांच्या बोगस सहीने 18 लाख रुपये सरकारच्या तिजोरीतून परस्पर काढण्यात आले आहेत. अशी तक्रार सरकारचे अपर क्रीडा सचिव सतिश जोंधळे यांनीच मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तसा गुन्हा पोलिसांनीही दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र सरकारचे क्रीडा संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांना आरोपी करण्यात आलं आहे. हे जे पैसे होते ते क्रीडा संघटनाचं अनुदान होतं. ह्या पैशातून राज्य आणि जिल्हा क्रीडा स्पर्धांसाठी अनुदान दिलं जातं असे त्या पैशांचा घोटाळा केला गेला आहे. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे. त्यावेळचे जॉइन्ट स्पोर्ट्स डायरेक्टर आर.आर. कापडणीस यांनी या अनुदानाच्या प्रस्तावावर मंत्र्यांची बोगस सही घेतल्याचा आरोप आहे. पण कापडणीस यांनी मात्र मंत्र्यांचीच सही घेतल्याचं म्हटलंआहे तर तत्कालीन मंत्री पुरकेंनी मात्र ही सही आपली नसल्याचं सांगत हात झटकले आहेत.अपर सचिव जोंधळे यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. जोंधळे म्हणतात, या अनुदान प्रस्तावावरील क्रीडा मंत्र्यांची सही बोगस आहे. या विषयाशी संबधित तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी काही लाभार्थी संस्थाशी संगनमत करून अनुदान गैरमार्गानं उपलब्ध करून घेतलं आहे. याबाबत विभागीय उपसंचालकांनी सावध भूमिका घेतली आहे. या घोटाळ्याची आता विभागीय चौकशीही सुरू असून येत्या आठवड्यात त्याचा अहवाल जाहीर होईल.पण यामुळे राज्याच्या क्रीडा खात्यातील सावळा गोंधळ मात्र उघडकीस आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 01:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close