S M L

डॉ. मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार

22 जानेवारी नवी दिल्लीआशिष दीक्षितशरद पवार देशाचे पुढचे पंतप्रधान बनावेत. ही राष्ट्रवादीने व्यक्त केलेली इच्छा काँग्रेसने धुडकावून लावली. पण डॉ. मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्याची फारशी इच्छा नाही. त्यामुळे युपीएचं सरकार पुन्हा सत्तेत आलं.तर पंतप्रधान कोण असेल या चर्चेला राष्ट्रवादीने तोंड फोडलंय.डॉ. मनमोहन सिंग हेच युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असं काँग्रेसने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या विस्तारित कार्यकारिणीने शरद पवार पंतप्रधान व्हावेत, अशी भावना व्यक्त केली होती. ती अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला अजिबात रुचली नाही. त्याचं एक कारण आहे की काँग्रेस पक्षातच पंतप्रधानपदासाठी मोठी रांग लागली आहे.डॉ. मनमोहन सिंग यांना तब्येत साथ देत नाही. तर अर्जुन सिंग आणि प्रणव मुखर्जींना पंतप्रधानपद देण्यास सोनिया गांधी फारशा उत्सुक नाहीत. राहुल गांधींचं नाव दबक्या आवाजात घेतलं जातं आहे. पण परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे राहुल गांधींचं नाव इतक्यात पुढे केलं जाणार नाही, असं समजतंय. काँग्रेसची कामगिरी निवडणुकीत चांगली झाली नाही.तर आपण पंतप्रधान होऊ शकतो. असं पवार, लालू आणि मुलायम सिंगांसारख्या कित्येक ज्येष्ठांना वाटतंय. सात रेसकोर्स रोडसाठीची स्पर्धा आता अधिकच रंगत जाणार, असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2009 06:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2009 06:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close