S M L

भाजपच्या निवडणूक समितीची घोषणा

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2013 09:15 PM IST

gadkari and modi19 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची 'इलेक्शन टीम' तयार झाली आहे . भाजपनं आज निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केलीय. समितीत मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू आणि अनंत कुमार यांचा समावेश आहे. तर माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं जाणार आहे. यासाठी त्यांना विनय सहस्त्रबुद्धे मदत करतील.

तर निवडणूक जाहीरनामा समितीचं अध्यक्षपद मुरली मनोहर जोशी यांच्याकडे देण्यात आलंय. भाजपच्या प्रचार मोहिमेला ऑगस्टपासून सुरू आहे. देशभरात 100 ठिकाणी प्रचारसभा घेण्यात येतील. पहिल्यांदा मतदान करणार्‍या मतदारांना आकर्षित करण्यासाठी चार जणांची वेगळी टीम स्थापन करण्यात आलीय. त्यात अमित शाह, नवज्योत सिंग सिद्धू, त्रिवेंद्रसिंग रावत आणि पूनम महाजन यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रचाराची जबाबदारी सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अमित शाह, आणि डॉ. सुधांशी त्रिवेदी यांच्याकडे देण्यात आलीय. नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीतल्या निवडणुकींचीही जबाबदारी देण्यात आलीय. निवडणुकीसाठी भाजपनं वेगवेगळ्या 20 उपसमितींची स्थापना केलीय. या सगळ्या समित्यांवर गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची देखरेख असेल. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व्यवस्थापन समिती काम करेल, असं भाजप नेते अनंतकुमार यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2013 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close