S M L

अकरावीच्या प्रवेशाबाबत नवीन निर्णय

22 जानेवारी मुंबईमुंबई मेट्रोपोलिटीयन रीजनच्या 70-30 टक्के कोट्यानुसार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. याविषयीचा शासकीय आदेश लवकरच काढला जाणार आहे. म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुंबईतल्या कॉलेजमध्ये 70 टक्के आरक्षण कोटा दिला जाईल. यामध्ये पश्चिम उपनगरात वसई- विरारपर्यंत, मध्य उपनगरात खोपोली-कर्जत पर्यंत तर हार्बर उपनगरांमध्ये पेण- अलिबागच्या विद्यार्थ्यांना फायदा मिळेल. गेल्यावर्षी फक्त मुंबईतल्या विद्यार्थ्यांना 70:30 टक्के जिल्हा कोटा देण्याच्या निर्णयाने विशेषत: ठाण्यातल्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार होता. त्याविरोधात प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2009 12:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2009 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close