S M L

शिवसेनेचे युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2013 08:57 PM IST

शिवसेनेचे युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

Image img_228842_adityathakare_240x180.jpg20 जुलै : शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मी निवडणूक लढवू शकतो. लोकांनी आग्रह केला आणि आपल्याला वाटलं तर 3 वर्षानंतर आपण हा निर्णय घेऊ. असं आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. ठाकरे घराण्यात अजून कोणीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरेंच हे विधान महत्वाचं आहे.

 

आदित्य ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र.. ऑक्टोबर 2010 साली सेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आदित्य ठाकरे यांची युवा सेना लाँन्च करण्यात आली होती. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर राजकीय,सामाजिक, रोजगार, तरुणांच्या समस्या अशा अनेक विषयांना धरुन आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. आज ही युवा सेना तीन वर्षांची झालीय.

 

2014 च्या निवडणुकीच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतेपद देण्यात यावं अशी हालचालही सेनेत सुरू झाली होती. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे 23 जानेवारीला सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आदित्य ठाकरेंना नेतेपद देण्याचं जवळपास निश्चित झालं होतं. पण सेनेतली धुसफूस आणि घराणेशाहीच्या आरोपामुळे आदित्य ठाकरेंचं नेतेपद हुकलं. आता खुद्द आदित्य यांनीच सक्रीय राजकारणात सहभाही होण्याची इच्छा व्यक्त केलीय. आजपर्यंत ठाकरे घराण्यातून कुणीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विधानाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. आता त्यांच्या या इच्छेबद्दल त्यांचे वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेता ते महत्त्वाचं ठरणार आहे. पण आज आदित्य ठाकरेंचं वय 22 वर्ष आहे. जर आदित्य ठाकरे तीन वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुकीत उतरले तर त्यात नवल काही नसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2013 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close