S M L

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेविषयी उत्सुकता

24 जानेवारी, मुंबई राज ठाकरे यांच्या ठाणे इथल्या आजच्या सभेला पोलिसांनी मंजुरी दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांना 19 अटी घालण्यात आल्या आहेत. या सभेमुळे कायदा आणि सुव्यावस्तेचा प्रश्न उभा राहू नये, हाच ठाणे पोलिसांचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंच्या आज होणार्‍या सभेआधी ठाणे पोलिसांनी 144 कलमानुसार राजना नोटीस बजावली होती. आणि त्याचे उत्तर दिल्यावर मनसेच्या या सभेला पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलिस स्टेशन्सना हाय ऍलर्टचा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडली तर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आल्याची माहिती जॉइंट कमिशनर के. एल. प्रसाद यांनी दिली आहे.या परवानगीने मनसे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या सभेमुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धडाकेबाज सुरुवात करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंची सभा आणि उत्तरप्रदेश दिन एकाच दिवशी आल्याने राज ठाकरेंना भाषणसाठी अटी घालून पोलिसांनी प्रक्षोभकता कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र राज ठाकरे किती अटींचे पालन करणार, हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 04:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 04:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close