S M L

'अमर्त्य सेन यांचं भारतरत्न परत घ्या'

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2013 04:54 PM IST

'अमर्त्य सेन यांचं भारतरत्न परत घ्या'

25 जुलै: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होऊ नये असं स्पष्ट मत नोबेल पुरस्कार विजेते आणि अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी सीएनएन-आयबीएनकडे व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे व्यथित झालेले भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी अमर्त्य सेन यांचं भारतरत्न काढून घ्या, अशी खळबळजनक मागणी केली आहे. सेन यांना एनडीएच्या कार्यकाळात भारतरत्न दिलं होतं, ते परत काढून घेण्यात यावं असं मित्रा यांनी म्हटलंय. यावर हे मित्रा यांचं वैयक्तिक मत असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय. तर खुद्द नरेंद्र मोदींनी ही तर असहनशिलतेची हद्द आहे असं ट्विट केलंय.

विशेष म्हणजे काँग्रेसच्या अन्नसुरक्षा विधेयक, कोळसा घोटाळा यावर भाजपने कडाडून टीका केली. पण मोदींच्या बद्दल अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी आपलं मत व्यक्त केलं तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी भाजप नेत्यांनी गरळ ओकायला सुरूवात केलीय. चंदन मित्रा यांच्या ट्विटवर जेडीयू, काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केलीय. काँग्रेस नेते शकील अहमद यांनी मोदींचं ट्विटची कॉपी करून आता ही असहनशिलतेची हद्द नाही का? असा सवाल उपस्थित केलाय.

तर जेडीयू नेता के.सी. त्यागी यांनी भाजपकडून अशा प्रकारची होणार मागणी म्हणजे हुकूमशहा पेक्षा कमी नाही. अमर्त्य सेन यांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मिळाला होता. आता असं वाटतंय मोदी पर्व सुरू झाल्याबरोबर वाजपेयी,अडवाणींच्या पर्वाचा अस्त होतोय. तर काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ही कोणती मानसिकता आहे. लोकांनी आपलं मतही व्यक्त करू नये का? असा सवाल उपस्थित केलाय. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच भाजपने हात झटकलेत. भाजपचे प्रवक्ता निर्मला सितारमन यांनी चंदन मित्रा यांची मागणी दुर्देवी आहे. भाजप याचा भाग नाही. ज्यानी असं काही म्हटलं ते त्यांच्या वैयक्तिक मत आहे असं म्हटलंय. पण भाजप नेत्यांच्या अशा मागणीमुळे भाजपलाच अडचणीत आणलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2013 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close